मुंबई - Khatron Ke Khiladi 14 :बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा लोकप्रिय टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 14' घेऊन पुनरागमन करत आहे. रोहित शेट्टीनं होस्ट केलेला 'खतरों के खिलाडी 14' हा स्टंट आधारित साहसी रिॲलिटी शोपैकी एक आहे. काही दिवसापूर्वी, निर्मात्यांनी 'खतरों के खिलाडी 14'च्या रिलीजबाबत खुलासा केला होता. हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यावेळी या रिॲलिटी शोचे शूटिंग रोमानियामध्ये झाली आहे. 'खतरों के खिलाडी 14'चा प्रीमियर 27 जुलै 2024 रोजी फक्त कलर्स आणि जिओ सिनेमावर होणार आहे.
रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 14'च्या रिलीजची तारीख आली समोर, 'हे' स्पर्धक होणार सहभागी - rohit shetty - ROHIT SHETTY
Khatron Ke Khiladi 14 : रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी 14' शोची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय आता तीन फायनलिस्ट स्पर्धकांची नावदेखील समोर आली आहेत.
Published : Jul 14, 2024, 12:41 PM IST
'खतरों के खिलाडी 14' स्पर्धक : काही दिवसापूर्वी निर्मात्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये रोहित शेट्टी म्हणतो,"युरोपमधील खेळाडू सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. स्पा, शॉपिंग आता मूड बदले आणि वातावरण देखील बदलेल. हे सर्वात वाईट स्वप्न ठरणार आहे. 'देश नवा असून खेळ नवा आहे. खेळाडू नवीन आहेत. त्यामुळे यावेळी मी रोमानियातील भीतीची नवी कहाणी लिहिणार आहे." 'खतरों के खिलाडी 14' च्या स्पर्धकांबद्दल सांगायचं झालं तर गश्मीर महाजनी, नियती फतनानी, असीम रियाझ, करणवीर मेहरा, निमृत अहलुवालिया, अभिषेक कुमार, शालीन भानोट, सुमोना चक्रवर्ती आणि कृष्णा श्रॉफ या सीझनमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहेत.
तीन फायनलिस्ट स्पर्धक : शोचा प्रोमो शेअर करताना कलर्स टीव्हीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "रोमानियाच्या सुंदर रस्त्यांवर धोक्यांचा कहर पाहायला मिळेल. कारण यावेळी तुम्हाला भीतीच्या नवीन स्टोरीज फक्त रोमानियामध्ये पाहायला मिळतील." साहसी शो 'खतरों के खिलाडी 14' चे तीन फायनलिस्ट गश्मीर, कृष्णा आणि करण वीर आहेत. याआधी शोचे स्पर्धकही रोमानियाहून परतताना मुंबई विमानतळावर दिसले होते. यावेळी या शोमध्ये धोकादायक स्टंट पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये स्पर्धकांना भीतीचा सामना करावा लागेल. प्रत्येक लहान तपशील जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल.