लातूर Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा रितेश अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतो. रविवारी (18 फेब्रुवारी) लातूर येथे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. या सोहळ्याला संबोधित करताना रितेश देशमुखनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी तो भावूक झाल्याचही पाहायला मिळालं.
यूजरची पोस्ट : सध्या काँग्रेस नेते आपला पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याची मालिका सुरू आहे. यातच सोशल मीडियावर एका यूजरनं विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडल्याचा तसेच त्यांनी शिवसेना आणि भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवल्याचा दावा केला होता. यूजरनं लिहिलं, "विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही, असं रितेश देशमुखनं म्हटलं. पण, सत्य असं आहे की, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती."