महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकरांनी व्यक्त केला शोक, पोस्ट व्हायरल - RATAN TATA NO MORE

Ratan Tata : नॅशनल आयकॉन रतन टाटा यांच्या निधनावर सलमान खान, रणवीर सिंग, रोहित शेट्टी यांच्यासह अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

Ratan Tata
रतन टाटा (सलमान खान-रणवीर सिंग (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 10, 2024, 1:58 PM IST

मुंबई : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निधन झालं आहे. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यानं सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. आता त्याच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण देश शोकामध्ये बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनावर अनेक चित्रपट क्षेत्रातील कलाकरांनी शोक व्यक्त केला आहे.

सलमान खान : रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची प्रतिक्रिया आली आहे. बुधवारी मध्यरात्री, 'भाईजान'नं एक्सवर पोस्ट करत लिहिलं आहे की, 'श्री. रतन टाटा यांच्या निधनानं खूप दु:ख झालं आहे.'

रणवीर सिंग : बॉलिवूड स्टार रणवीर सिंगनेही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर इन्फिनिटीचा इमोजी जोडला आहे.

अजय देवगण : रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अजय देवगणनं त्याच्या एक्स हँडलवरील पोस्टवर लिहिलं की, 'एका दूरदर्शी व्यक्तीच्या जाण्यानं जग दु:खी झालंय. रतन टाटा यांचा वारसा पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. भारतासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. तुमच्या आत्म्याला शांती लाभो सर.'

रतन टाटा (सलमान खान आणि रणवीर सिंग(ANI))

रोहित शेट्टी : 'सिंघम अगेन' दिग्दर्शक रोहित शेट्टीनं रतन टाटा यांचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये 'आरआयपी (RIP) रियल हिरो' असं लिहिलंय. याशिवाय त्यानं या पोस्टला हात जोडलेल्या इमोजीही पोस्ट केला आहे.

संजय दत्त :टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांच्या निधनानं संजय दत्तलाही दु:ख झालंय. रतन टाटा यांचा फोटो शेअर करताना 'संजू बाबा'नं लिहिलं की, 'भारतानं आज एक खरा दूरदर्शी गमावला आहे. ते सचोटीचे आणि करुणेचे उदाहरण होते, त्यांचे योगदान व्यवसायाच्या पलीकडे असून त्यांनी असंख्य लोकांना प्रभावित केलंय. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो'.

वरुण धवन :वरुण धवननं आपल्या इंस्टाग्राम हँडलवर रतन टाटा यांचा फोटो अपलोड केला असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कॅप्शनमध्ये 'आरआयपी (RIP) सर रतन टाटा' असं लिहिलं आहे.

एकनाथ शिंदे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री सांगितलं की, उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करेल. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'टाटांचे पार्थिव गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत एनसीपीए ( NCPA) येथे सार्वजनिक आदरांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे.'

हेही वाचा :

रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर एक्स गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल यांनी केली भावनिक पोस्ट शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details