मुंबई - Ranbir Kapoor outfit : राहाची आई म्हणजेच आलिया भट्टनं तिचा नुकताच 31वा वाढदिवस साजरा केला आहे. आलियाच्या वाढदिवशी, रणबीर कपूरनं मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अंबानी कुटुंबातील सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. आलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि आकाश अंबानी दिसले. याशिवाय आलियाची आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि सासू नीतू कपूर यांनीही या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. प्रत्येकजण मुंबईतील ताज हॉटेलच्या बाहेर स्पॉट झाले.
रणबीर कपूरच्या टी-शर्टनं सर्वाचं लक्ष घेतलं वेधून :दरम्यान, आलियाच्या वाढदिवसाच्या दिवशी रणबीर कपूरच्या खास टी-शर्टनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आलियाच्या वाढदिवसाला झालेल्या पार्टीत रणबीर कपूरनं एक सुंदर टी-शर्ट परिधान केलं होतं. त्या टी-शर्टवर राहाचं नाव लिहिलं होतं. रणबीर कपूरचा हा कस्टमाईज टी-शर्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. रणबीर कपूरचे आपल्या मुलीबद्दलचे प्रेम आणि आपुलकी पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकजण हार्ट इमोजी पोस्ट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.