महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training - RANBIR KAPOOR FITNESS TRAINING

Ranbir Kapoor : 'रामायण' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणबीर हा श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 10:03 AM IST

मुंबई - Ranbir Kapoor :अभिनेता रणबीर कपूर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. आतापर्यत रणबीरनं शूटिंग सुरू केलेले नाही. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रणबीरच्या ट्रेनरनं त्याच्या फिटनेस सेशनची झलक शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनं लिहिलं, ''डीकंप्रेशन वीकमध्ये रणबीरबरोबर ग्रामीण भागात गेलो.'' व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणबीरनं शर्ट घातलेला नाही.

रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : रणबीर हिरव्यागार परिसरात फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. याशिवाय तो ट्रेनरबरोबर धावताना दिसत आहे. रणबीर कधी केटल बेलनं तर कधी दोरीचे व्यायाम करत आहेत. त्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, ''श्रीरामचं पात्र हे चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं आहे. मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''रामायण' चित्रपटात श्रीरामच्या भूमिकेत रणबीरला पाहण्यासाठी मी आतुर आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''रामायण ' चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट होणार आहे.'' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

रणबीर कपूर रामायण चित्रपटासाठी सज्ज :रणबीर कपूर 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीता माताच्या भूमिकेत दिसेल, तर यश 'रावण'ची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारीचा चित्रपट 2 एप्रिलला फ्लोअरला जाणार आहे. प्रभू रामाच्या बालपणीच्या दृश्याचे शूटिंग आधीच सुरू झाले आहेत. 'रामायण' चित्रपटाचे दोन भाग असणार आहेत. या चित्रपटात रणबीर, साई आणि यश व्यतिरिक्त सनी देओल, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, लॉरा दत्ता, रवी दुबे, शीबा चढ्ढा आणि इतर कलाकर असणार आहेत.

हेही वाचा :

  1. नयनतारानं नवीन ऑफिसचे फोटो शेअर करत टीमचे मानले आभार - Nayanthara
  2. संदीप रेड्डी वंगा रेड्डीचं भाकित, "प्रभास स्टारर स्पिरिटची पहिल्या दिवशी कमाई होईल 150 कोटी" - Sandeep Reddy Vanga
  3. रक्तदान करुन अल्लु अर्जुन साजरा करतो आपला वाढदिवस - Allu arjun birthday

ABOUT THE AUTHOR

...view details