महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर आणि विकी कौशल नव्या ट्रेंडी लूकसह मुंबई विमानतळावर झळकले - RANBIR KAPOOR AND VICKY KAUSHAL

रणबीर कपूर आणि विकी कौशल ही जोडी संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यानदोघंही जण मुंबई विमानतळावर दिसून आले.

Ranbir Kapoor and Vicky Kaushal
रणबीर कपूर आणि विकी कौशल (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 28, 2024, 7:52 PM IST

मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि विकी कौशल अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसून आले. आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही स्टार्सनी आपल्या कॅज्युअल पण तितक्याच ट्रेंडी लूकनं सर्वांना चकित केलं आहे.

रणबीर कपूरनं त्याचा एअरपोर्ट लूक सिंपल पण स्टायलिश ठेवला होता. बॅगी जीन्सच्या जोडीनं त्यानं ओव्हरसाईज जॅकेट परिधान केलं होतं. त्याच्या खांद्यावर बॅकपॅक आणि मास्कसह सनग्लासेस देखील होते. त्यानं कॅमेऱ्यांसाठी पोज दिली नाही. त्यामुळं पापाराझींच्या टीमनं त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला परंतु विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला धावत घेऊन जात तातडीनं एस्कॉर्ट केलं.

विकी कौशलनं आपल्या नवीन लूकसह सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तो ऑलिव्ह ग्रीन शर्टसह बेज बॅगी पँटमध्ये दिसला, सनग्लासेस आणि कॅपसह त्यानं आपला लूक पूर्ण केला होता. रणबीरपेक्षा वेगळं वागत त्यानं विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी स्मितहास्य केलं आणि पापाराझींसाठी पोज दिली.

विकी कौशल आणि रणबीर कपूर हे दोघंही संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात आलिया भट्टसोबत एकत्र दिसणार आहेत. अभिनेता रणबीर कपूरनं 2007 मध्ये पदार्पण केलेल्या 'सावरिया' चित्रपटानंतर तो संजय लीला भन्साळी यांच्या बरोबर दुसऱ्यांदा काम करणार आहे. विकी कौशलनं मात्र अद्याप एकदाही संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम केलेलं नाही. तर रणबीरची पत्नी आलिया भट्टनं 2022 च्या'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात भन्साळीबरोबर काम केलं होतं.

गेल्या महिन्यात, तरण आदर्श यांनी त्यांच्या X वर याविषयीचं अपडेट शेअर केलं होतं. "रणबीर कपूर - आलिया भट्ट - विकी कौशल: संजय लीला भन्साळी यांच्या आगामी लव्ह अँड वॉर चित्रपटाची रिलीज टारीख ठरली आहे. 20 मार्च 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे." , असं अपडेट दिलं होतं.

जानेवारी 2024 मध्ये 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. इंस्टाग्रामवरील मूळ घोषणेमध्ये असं लिहिलं होतं की, "आम्ही तुमच्यासाठी संजय लीला भन्साळी यांची एपिक सागा 'लव्ह अँड वॉर' हा मुव्हा 2025 च्या ख्रिसमसला घेऊन येत आहोत.' रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या प्रमुख त्रिकुटाच्या या प्रोजेक्टवर सह्या झाल्या आहेत. 'लव्ह अँड वॉर' येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details