मुंबई - Ranbir and Alia Second Wedding Anniversary :अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अलिया भट्ट यांचा लग्नाचा 14 एप्रिल रोजी दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. आलिया यापूर्वी हिट चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि रणबीर कपूर हा 'ॲनिमल' चित्रपटामध्ये दिसला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दरम्यान रणबीर हा 'रामायण' चित्रपटात रामची भूमिका साकारून पुन्हा बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान रणबीर आणि अलियानं 'ब्रह्मास्त्र' रिलीज होण्यापूर्वी 14 एप्रिल 2022 रोजी शाही पद्धतीनं लग्न केलं होतं. लग्नानंतर अडीच महिन्यांनी म्हणजेच 27 जून 2022 रोजी आलियानं हॉस्पिटलमधून गर्भधारणा चाचणीचा फोटो शेअर करून चाहत्यांना गरोदरपणाची गोड बातमी दिली होती.
आलिया लग्नाआधी प्रेग्नंट : यानंतर युजर्सनं आलियाला लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचं म्हणत ट्रोल केलं होतं. यावेळी तिनं युजर्सकडे दुर्लक्ष करून तिचा संपूर्ण गर्भधारणा कालावधी एन्जॉय केला. यानंतर तिनं ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तर, 5 नोव्हेंबर 2022 रोजी आलियानं मुलीला जन्म दिला, तिचे नाव राहा असं या जोडप्यानं ठेवलं. राहा आज दीड वर्षांची झाली आहे. रणबीर आणि आलियानं ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा जगाला दाखवला होता. आता अनेकदा रणबीर आपल्या मुलीबरोबर बाहेर जाताना दिसतो.