महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राम चरणच्या वाढदिवसाच्या निमित्त 'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं होईल रिलीज - Ram Charan CDP birthday Celebration - RAM CHARAN CDP BIRTHDAY CELEBRATION

Game Changer First Song : साऊथचा सुपरस्टार राम चरणचा उद्या, 27 मार्च रोजी वाढदिवस आहे. अनेकजण त्याला ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय उद्या त्याच्या 'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं रिलीज होणार आहे.

Game Changer First Song
गेम चेंजरमधील पहिलं गाणं

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 1:42 PM IST

मुंबई - Game Changer First Song : ग्लोबल स्टार राम चरणच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. तो 27 मार्च रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. राम चरणच्या बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' या चित्रपटातील 'जारागांडी' या पहिल्या गाण्याची रिलीज डेट समोर आली आहे . उद्या म्हणजेच 27 मार्च रोजी राम चरणच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त 'जारागांडी' हे गाणं सकाळी 9 वाजता रिलीज करण्यात येणार आहे. या गाण्याला साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीतबद्ध केलंय. 'गेम चेंजर' हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये राम चरण आयएएसची भूमिका साकारणार आहे.

'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं होईल रिलीज : 'गेम चेंजर' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. 'गेम चेंजर' चित्रपटाची रिलीज डेट 27 मार्च रोजी घोषीत होऊ शकते असा अंदाज लावल्या जात आहे. या चित्रपटाकडून राम चरणला खूप अपेक्षा आहेत. याआधी या चित्रपटामधील कियारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती साडीत साध्या लूकमध्ये दिसली होती. तिचा हा फोटो अनेकांना आवडला होता. कियारानं यापूर्वी साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र तिचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

राम चरणचे आगामी चित्रपट :दरम्यान राम चरणला त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वी ॲडव्हान्समध्ये अनेकजण सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहे. आज 26 मार्च रोजी सकाळी त्याला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये फिल्म प्रोडक्शन हाऊस डीव्हीव्ही मुव्हीज (DVV Movies) आणि 'गेम चेंजर'चे निर्माते श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सनं शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय राम चरणच्या चाहते सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राम चरणच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'ऑटो जानी', 'द इंडिया हाऊस', 'मेरुपू' आणि 'आरसी 16' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानी तरुंगात अडकलेल्या मच्छीमारांची प्रेरणादायी गोष्ट 'थांडेल', नागा चैतन्यने सांगितला प्रेमकथेचा तपशील - Sai Pallavi in Thandel
  2. आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीनं मैदानातून अनुष्का शर्मासह मुलांना केला व्हिडिओ कॉल - virat kohli video viral
  3. जान्हवी कपूरनं 'देवरा पार्ट 1'च्या गोव्यातील शुटिंग सेटवरून केला फोटो शेअर - Janhvi kapoor

ABOUT THE AUTHOR

...view details