महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत सिंग ते क्रिती खरबंदा 'या' नववधू पहिला होळी साजरी करण्यासाठी सज्ज - first festival of colors - FIRST FESTIVAL OF COLORS

New Bollywood brides Holi Celebration : होळी सण 25 मार्च रोजी आहे. हा सण हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या थाटानं साजरा केला जातो. काही बॉलिवूडमधील काही जोडप्यांचे नुकतेच लग्न झालं आहे. होळी विशेषमध्ये त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

New Bollywood brides Holi Celebration
बॉलिवूड वधू होळी सेलिब्रेशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 11:46 AM IST

मुंबई - New Bollywood brides Holi Celebration : होळी हा सण रंगाचा आहे. यावेळी होळी 25 मार्च रोजी साजरी केली जात आहे. बॉलिवूडमध्ये होळी हा सण खूप सुंदर पद्धतीनं साजरा केला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवविवाहित जोडप्यांच्या पहिली होळीबद्दल जाणून घेणार आहेत.

  • क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट :क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटनं 15 मार्च रोजी गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले. आता लग्नानंतर हे जोडपे त्यांची पहिली होळी साजरी करणार आहे.
  • रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी :अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्न केलं. आता लग्नानंतर या जोडप्याची ही पहिली होळी असेल.
  • लिन लैशराम आणि रणदीप हुडा :अभिनेता रणदीप हुड्डानं नोव्हेंबर 2023 मध्ये अभिनेत्री लिन लैशरामबरोबर इम्फाळमध्ये पारंपारिक मेईतेई पद्धतीनं लग्न केलं. आता हे जोडपे लग्नानंतर पहिली होळी खेळणार आहे.
  • आयरा खान आणि नुपूर शिखरे : आमिर खानची मुलगी आयरा खानचा विवाह 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथील ताज अरावली रिसॉर्टमध्ये झाला. आता आयरा खान नुपूरबरोबर तिची पहिली होळी मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहे.
  • दिव्या अग्रवाल : टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवालनं 3 जानेवारीला बिझनेसमन बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर मराठी रितीरिवाजांनुसार लग्न केलं. लग्नानंतर दिव्या पहिली होळी आपल्या पतीबरोबर खेळणार आहे.
  • सुरभी चंदना :टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनानं 13 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2 मार्च रोजी बॉयफ्रेंड करण शर्माबरोबर 7 फेरे घेतले. आता हे जोडपे त्यांची पहिली होळी साजरी करणार आहे.
  • सोनारिका भदौरिया : टीव्ही मालिकेत 'पार्वती'च्या भूमिकेत दिसणारी सोनारिका भदौरियानं बिझनेसमन बॉयफ्रेंड विकास पाराशर सवाई माधोपूर येथे लग्न केलं. लग्नानंतर सोनारिकाची पहिली होळी असणार आहे.
  • परिणीती चोप्रा :परिणीती चोप्रानं 24 सप्टेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्न केलं आहे. परिणीती तिच्या पहिल्या दिवाळीनंतरची पहिली होळी साजरी करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details