मुंबई - Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding Menu : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. हे जोडपे 21 फेब्रुवारीला गोव्यात एका विशेष थीमवर लग्न करणार आहेत. आता त्यांच्या घराघरातही लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नातील मेनूबद्दल बातम्या समोर येत आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नामधील खाद्य पदार्थांच्या मेनूवर विशेष भर देण्यात आली आहे. लग्नामधील मेनू हा ग्लूटेन मुक्त आणि साखर मुक्त असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्यानं भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांसाठी खास शेफची नियुक्ती केली आहे.
रकुल आणि जॅकीचा मेनू असेल हेल्दी : प्रत्येकाच्या आरोग्याचा विचार करून मेनू तयार करण्यात येणार आहे. लग्नसमारंभात आरोग्याबाबत जागरूक लोकांसाठी विशेष मेनू हेल्दी असणार असल्याचं समजत आहे. अनेक खाद्य पर्यायांमुळे, अतिथी काळजी केल्याशिवाय त्यांच्या जेवणाचा आनंद घेऊ शकणार आहे. रकुल तिच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहे आणि ती फक्त हेल्दी फूड खात असते. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ सारखे आरोग्याविषयी जागरूक सेलिब्रिटी देखील या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही स्टार्स जॅकी भगनानी निर्मित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.