महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रक्षणाबंधनानिमित्त पाहा हे' सदाबहार चित्रपट, लाडका भाऊ-लाडका बहिणीमधील नाते होईल अधिक मजबूत - RAKSHA BANDHAN 2024 - RAKSHA BANDHAN 2024

Indian Movies on Raksha Bandhan: रक्षाबंधननिमित्त तुमच्या भावंडांबरोबर किंवा बहिणींबरोबर काही विशेष चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आम्ही खास चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. पहा सविस्तर यादी...

Indian Movies on Raksha Bandhan
रक्षाबंधनावर भारतीय चित्रपट (सलमान खान आणि जूनियर एनटीआर (IANS-Canve))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 3:23 PM IST

मुंबई - Indian Movies on Raksha Bandhan: रक्षाबंधन हा सण आज (19 ऑगस्ट) देशात खूप आनंदात साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव असणार हा सण विशेष महत्वाचा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची संरक्षण करणार असल्याचं वचन देत असतो. या शुभ दिवशी तुम्ही आपल्या कुटुंबासह भाऊ आणि बहिण्याच्या नात्यावर आधारित असलेले चित्रपट पाहून आपला दिवस खास बनवू शकता.

1.बंधन (1998) : अभिनेता सलमान खान, जॅकी श्रॉफ, रंभा, अश्विनी भावे स्टारर 'बंधन' चित्रपट हा भाऊ आणि बहिणीमधील अनोखे बंध दर्शवितो. राजेश मलिक, के. मुरली मोहना राव दिग्दर्शित हा चित्रपट 1998 मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 12.10 कोटींची कमाई केली होती.

2. रेशम की डोरी (1974) : 'रेशम की डोरी' हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, सायरा बानू, राजेंद्र नाथ, सुजित कुमार, जय श्री टी, सप्रू, सज्जन, रमेश देव, कुमुद चुगानी यांनी उत्तम अभिनय केला. आत्माराम हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट खूप भावनिक आहे. चित्रपटात एका भावाची कहाणी आहे. तो आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असतो. त्याला आपल्या बहिणीचं लग्न एका चांगल्या कुटुंबात करायचे असते. या चित्रपटाची पुढची कहाणी जाणून घेण्यासाठी तुम्ही आज हा चित्रपट पाहू शकता.

3.राखी (2006) :साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर 'राखी' हा तेलुगू भाषेतील ॲक्शन चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कृष्णा वामसी यांनी केलंय. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरबरोबर इलियाना डिक्रूझदेखील आहे. याशिवाय 'राखी'मध्ये चंद्र मोहन, सरथ बाबू, चर्मे कौर आणि इतर कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता.

4. सच्चा झूठा (1970) : राजेश खन्ना, मुमताज, विनोद खन्ना अभिनीत 'सच्चा झूठा' हा सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं त्यावेळी प्रचंड बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना 1971 च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा चित्रपट भोला (राजेश खन्ना) आणि त्याची बहीण बेलू (कुमारी नाज) यांच्या कहाणीभोवती फिरणारा आहे.

5. क्रोध (2000) : सुनील शेट्टी स्टारर 'क्रोध' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात भाऊ-बहिणीमधील प्रेम खूप सुंदर पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर रंभा, अपूर्व अग्निहोत्री, साक्षी शिवानंद हे कलाकर देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा-

  1. शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 35 किलोची भव्य राखी अर्पण; छत्तीसगडच्या भक्तानं तयार केली खास राखी - Raksha Bandhan 2024
  2. 5 भाऊ-बहिणीच्या जोड्यांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; दोन तर अजूनही खेळत आहेत... - Raksha Bandhan

ABOUT THE AUTHOR

...view details