महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan - RAKHI SAWANT AND ADIL KHAN

Rakhi Sawant and Adil Khan Durrani : अभिनेत्री राखी सावंतनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन माकडं वधू आणि वराच्या पोशाखात दिसत आहेत.

Rakhi Sawant and  Adil Khan Durrani
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 10:32 AM IST


एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो

मुंबई - Rakhi Sawant and Adil Khan Durrani : हिंदी चित्रपटसृष्टी ड्रामा क्वीन राखी सावंत आणि खान आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राखी सावंतनं नुकताच तिच्या इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन माकडं दिसत आहेत. या दोन माकडांनी लग्नाचा पोशाख परिधान केल्याचं दिसत आहे. याशिवाय फोटोत दोघेही एकमेकांकडे प्रेमानं बघताना दिसत आहेत. या फोटोच्या पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये राखीनं लिहिलं, ''कोण आहे ओळखले का?'' राखीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीच्या या पोस्टवर यूजर्स खूप कमेंट्स करत आहेत.

राखी सावंत शेअर केली पोस्ट : काही यूजर्सनं आदिल आणि सोमी खानच्या लग्नाचा फोटो असल्याचे म्हणत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एक युजरनं लिहिलं, 'आदिल-सोमी', तर दुसऱ्या यूजरनं लिहिलं, 'आदिल आपल्या पत्नीकडे खूप प्रेमानं पाहात आहे.'' याशिवाय राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारनेही कमेंट करत हसणारा इमोजी शेअर केला आहे. या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत. याशिवाय काहीजण राखीची देखील खिल्ली उडवत आहे. दरम्यान राखीनं एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल फोनवर बोलत आहे. फोनवरची व्हाईस रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. या फोनवरच्या संभाषणामध्ये आदिल आणि राखी भांडताना दिसत आहेत.

आदिल खान झाला ट्रोल : राखीनं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आदिल ट्रोल करत आहे. व्हाईस रेकॉर्डिंगमध्ये आदिल राखीला मिठी मार, तू माझी आहेस असं म्हणत आहे. या व्हिडिओत राखी सावंत सांगत आहे की, आदिलनं सोमी खानबरोबर लग्न केल्यानंतर तो तिला रोज वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतो. याशिवाय हा व्हिडिओ सोमीपर्यत पोहचला पाहिजे, असं देखील राखीनं म्हटलं आहे. दरम्यान राखीनं आदिल खानवर फसवणूक, घरगुती हिंसाचारचे आरोप केले होते. यानंतर आदिलला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आदिल खानला सहा महिन्यांसाठी तुरुंगात राहावे लागलं होतं.

हेही वाचा :

  1. पवन कल्याण आणि 'ओजी' टीमनं इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिनित्त पोस्टर केलं रिलीज - OG New Poster of Emraan Hashmi
  2. रिया कपूरनं 'क्रू' सेटवरचा करीना आणि क्रितीचा पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ केला शेअर, पाहा व्हिडिओ - Kareena Kapoor And Kriti Sanon
  3. देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज , पाहा व्हिडिओ - Bengal 1947 An Untold Love Story

ABOUT THE AUTHOR

...view details