मुंबई Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आता पुन्हा एकदा तिच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आली आहे. ती अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. राखीनं चित्रपटांपासून तर छोट्या पडद्यापर्यंत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता सोशल मीडियावरही राखीचा प्रभाव खूप जास्त आहे. ती आपल्या स्टाईलनं लोकांना हसवण्याचं काम करते. आता ती तिच्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीनं मेट गालाच्या सौदर्यवान अभिनेत्री आणि उर्फी जावेदच्या स्टाइललाही मागं सोडलं आहे. तिच्या नवीन टॉवेल आउटफिटनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिचा टॉवेल ड्रेस लाल रंगाचा आहे. राखी हा ड्रेस घालून एका कार्यक्रमात गेली होती.
राखी सावंतचा नवीन लूक व्हायरल :व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत राखीनं तिच्या डोक्यावर देखील टॉवेल गुंडाळला आहे. तसेच तिनं सिल्वर कलरचे बूट आणि काही दागिने घातले आहे. याशिवाय तिनं काही गुलाब देखील तिच्या ड्रेसला लावले आहे. आता या लूकमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राखीचा नवा लूक व्हायरल झाल्यानंतर तिला मेट गालामध्ये संधी मिळावी याबद्दल लोक म्हणत आहे. एका व्हिडिओमध्ये राखी गमतीनं म्हणते की अशा प्रकारची फॅशन आणणारी ती पहिली व्यक्ती आहे. ती कोणाचीही कॉपी करत नसल्याचं तिनं सांगितलं आहे. आता राखीच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. राखीला काहीजण मूर्ख असल्याचं म्हणत आहे.