मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक होते. या दोघांचं नात 2014मध्ये तुटलं होतं. घटस्फोटानंतर, हृतिक आणि सुजैन दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. हृतिक आणि सुजैनच्या घटस्फोटामागील कारण कधीच समोर आलेलं नाही. आता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी याबद्दल एक खुलासा केला आहे. दरम्यान हृतिक सबा आझादला डेट करत आहे. तसेच सुजैन ही अर्सलान गोनीबरोबर आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या जोडीदाराबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच हृतिक आणि सुजैन दोघेही त्यांच्या जोडीदाराबरोबर एकत्र पार्टी करताना दिसतात.
राकेश रोशननं केला खुलासा : एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिक आणि सुजैन खानबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. त्यांनी मुलाखतीत म्हटलं, "जे काही झाले ते दोघांमध्ये झाले. माझ्यासाठी, सुजैन आता देखील त्याचप्रमाणे आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांच्यात एक गैरसमज झाला आणि त्यांनी यावर काम देखील केलं. मात्र काहीही ठिक झालं नाही. आमच्यासाठी, ती आमच्या घरी आली, तसेच ती अजूनही कुटुंबातील एक सदस्य आहे. तसेच हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट खूप चर्चेत होता. सुजैनबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अनेकांनी हृतिकला दोषी मानलं होतं.