मुंबई - पोंगल आणि संक्रांतीच्या खास सणाच्या निमित्तानं रजनीकांतची मुख्य भूमिका असलेल्या 'जेलर 2' चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ४ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये रजनीकांत चोपताना अॅक्शन अवतारात दिसतो. या चित्रपटाचा टीझर तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सन पिक्चर्सनं फायनान्स केलं असून हा 'जेलर' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल आहे.
'जेलर 2' चित्रपटाचा हा टीझर जेव्हा थिएटरमध्ये झळकला तेव्हा चाहत्यांच्या उत्साहाला सीमा उरली नाही. लोक रजनीकांतला पाहून जल्लोष करत होते. थिएटर सेलिब्रेशनचे व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहेत. 'जेलर २' चा टीझर प्रदर्शित होताच आनंदानं भरलेल्या थिएटरमधील काही क्षण शेअर करताना, एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं की, "आज रजनीकांतनं वेत्री थिएटरमधील सबंध वातावरणच बदलून टाकलं."
टीझरवर प्रतिक्रिया देताना आणखी एका युजरनं लिहिलं: "जेलर 2 ची घोषणा करणारा हा व्हिडिओ अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बहुतेक टीझर आणि ट्रेलरपेक्षा १० पट चांगला आहे." तमिळ सुपरस्टार रजनीकांत आणि समांतर काळतील तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची तुलना करताना एका चाहत्यानं लिहिलंय की, "चिरंजीवी अयशस्वी झाले, अमिताभ बच्चन अयशस्वी झाले पण हा माणूस ७४ व्या वर्षीही तो स्टारडम कायम ठेवतोय."
'थलैयवा'चे अनेक चाहते मान्य करतात की वय हे त्याच्यासाठी केवळ एक आकडा आहे. वयाच्या 74 मध्येही रजनीकांत ज्या आवेशानं अॅक्शन सीन साकारतो आणि कालातीत स्वॅग देतो हे कमालीचं आहे. "७४ वर्षांचा माणूस अजूनही निरंतरपणे सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांसह इंडस्ट्रीवर राज्य करत आहे..हे नाव सुपरस्टार आहे रजनीकांत .." असं या चाहत्यानं लिहिलंय.
"सेटअप, स्टेजिंग, हाईट आणि इम्प्लिमेंटेशन - हे सर्व केवळ 4 मिनीटात अतिशय प्रभावीपणे पॅक केलं आहे. चित्रपटाच्या घोषणेचा हा टीझर काही चित्रपटांपेक्षा जास्त मेहनत घेऊन बनवण्यात आला आहे," असं एका युजरनं म्हटलंय.
'जेलर 2' चा टीझर पाहून लोक केवळ रजनीकांतचं कौतुक करत नाहीत तर या चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्या कामाचंही कौतुक करत आहेत. याशिवाय सोशल मीडिया युजर्सनी पटकथा, छायांकन आणि संवाद सादरीकरणाचीही दखल घेतली.
'जेलर २' हा रजनीकांतच्या प्रचंड ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जेलर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या टित्रपटानं जगभरात ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. सुपरस्टार रजनीकांत व्यतिरिक्त, या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार मोहन लाल, कन्नड अभिनेता शिवा राजकुमार, बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि तेलुगू अभिनेता सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन, तमन्ना, वसंत रवी, नागा बाबू, योगी बाबू, जाफर सादिक आणि किशोर यांसारखे कलाकार आहेत.