मुंबई - Rajinikanth Kalki 2898 AD :अभिनेता प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' जगभरात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करत आहे. प्रभासचे चाहते आणि चित्रपट समीक्षक 'कल्की 2898'च्या रिलीजची वाट आतुरतेनं पाहत होते. 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी रिलीज झाला असून या चित्रपटाचा क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 'कल्की 2898 एडी'ला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षक चांगला प्रतिसाद देत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक सुपरस्टार्सनीही आपल्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियाद्वारे देऊन, या चित्रपटामधील स्टार कास्टचं कौतुक केलंय.
रजनीकांतनं केलं 'कल्की 2898 एडी'चं कौतुक : सध्या 'कल्की 2898 एडी'ची स्तुती चौफेर होत आहे. दरम्यान साऊथ सुपरस्टार रजनीकांतनं देखील आपली प्रतिक्रिया या चित्रटाबाबत दिली आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांतनं एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "मी 'कल्की 2898 एडी' पाहिला आहे, हा चित्रपट खूप छान आहे. नाग अश्विननं भारतीय सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे, माझा प्रिय मित्र अश्विनी दत्त, अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि कल्कीची संपूर्ण टीम यांचे हार्दिक अभिनंदन. मी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे. गॉड ब्लेस यू." आता या पोस्टवर अनेक चाहते, या चित्रपटाबद्दल कौतुक करताना दिसत आहेत.