हैदराबाद - Rajinikanth in cop uniform : सुपरस्टार रजनीकांतने, त्याच्या 'वेट्टयान' या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी चेन्नईहून हैदराबादला विमानाने पोहोचला. त्याच्या आगामी 'वेट्टयान' या चित्रपटात त्याची फहद फसिलसह भूमिका आहे. चित्रपटाच्या सेटवरील रजनीकांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रजनीकांत त्याच्या 'वेट्टयान' चित्रपटाच्या सेटवर कारमधून येताना दिसत आहेत. रजनीकांतला भेटून चाहते आनंदित झाले आणि आनंदाने त्याच्या नावाचा जयघोष करु लागले. त्याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे रजनीकांत पोलिसांचा गणवेश परिधान केलेला दिसत होता. या चित्रपटात तो पोलिसाची भूमिका करणार असल्याचे समजते.
पोलिसांच्या पोशाखात रजनीकांतला पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाची लाट पसरली होती. या चित्रपटामध्ये तो निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत असून तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करताना दिसणार आहे. 'वेट्टयान'च्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटाच्या सभोवतालची चर्चा वाढली आहे. रजनीकांत चित्रपटाच्या एका दृश्याची तयारी करताना दिसत आहेत. यावेळी रजनीने हिरवा स्ट्रीप शर्ट, क्रीम ट्राउझर्स, तपकिरी शूज आणि त्याच्या स्टाईल सिग्नेचरचा चष्मा घातला होता.