महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकणार लग्नबेडीत; पाहा लग्नामधील विधीचा तपशील - Pulkit Kriti Wedding Details

Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच या दोघांच्या लग्नामधील होणाऱ्या विधीचा तपशील समोर आला आहे.

Pulkit and Kriti Wedding Details
पुलकित आणि क्रितीच्या लग्नाचा तपशील

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:00 AM IST

मुंबई - Pulkit Kriti Wedding Details : अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा आता लवकरच लग्न करणार आहेत. दिल्ली, एनसीआर येथील आयटीसी ग्रँड भारत येथे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत हे जोडपे लग्न करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. दरम्यान, या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित एक माहिती समोर आली आहे. आता दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. या जोडप्याच्या लग्नाचे विधी आजपासून म्हणजेच 13 मार्चपासून सुरू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज, बुधवारी, मेहंदी समारंभ सुरू होईल. यानंतर 14 मार्च रोजी जोडप्याला हळद लावली जाईल.

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नामधील विधी :हळदीनंतर हे जोडपे कुटुंब आणि मित्रांबरोबर कॉकटेल पार्टी करतील. 2 दिवसांच्या भव्य समारंभानंतर, क्रिती आणि पुलकित15 मार्च रोजी सात फेरे घेतील. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नासाठी मुंबईहून निघून दिल्लीत पोहोचले आहेत. मंगळवारी पुलकित आणि क्रिती मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. या जोडप्याचा विवाह सोहळा हा भव्य असणार आहे. क्रिती आणि पुलकितच्या लग्नात काही सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोघेही अनेकदा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, मात्र त्यांनी त्यांच्या साखरपुड्यामधील कुठलाही फोटो शेअर केला नाही.

पुलकित आणि क्रिती प्रेमकहाणी : या जोडप्यानं गुपचुप साखरपुडा केला आहे. त्याच्या साखरपुड्यामधील फोटो हे पुलकितच्या बहिणीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. पुलकित आणि क्रितीची प्रेमकहाणी 2019 मध्ये सुरू झाली होती. 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली. यानंतर मैत्री रुपांतर प्रेमात झालं. ही जोडी 'वीरे की वेडिंग' आणि 'तैश' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही एकत्र दिसली आहे. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुलकित शेवटी 'फुकरे 3' या चित्रपटामध्ये दिसला होता. दुसरीकडे क्रिती ही 'हाऊसफुल्ल 5', 'रिस्की रोमियो' 'वान' आणि 'पप्पु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. झी सिने अवॉर्ड्समध्ये किंग खानची धुम; 'जवान'नं मारली बाजी
  2. 'लाल सलाम'चे 21 दिवसांचे फुटेज झाले गायब, ऐश्वर्या रजनीकांतचा खुलासा
  3. Orry share video: रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरनं अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीत ओरीची उडवली खिल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details