मुंबई - Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती तिच्या व्यग्र शेड्यूलमधून कुटुंबाबरोबर अनेकदा वेळ घालवताना दिसते. प्रियांका आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिनं आणि स्वित्झर्लंडमधील शूट आणि प्रवासाची झलक शेअर केली आहे. आता तिनं आपल्या व्यग्र शेड्यूलमधून ब्रेक घेतला. ती क्रॅन्स-मॉन्टानामधील सुंदर निसर्गाच्या सानिध्यात पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससह या सुंदर सहलीचा आनंद घेताना दिसत आहे.
प्रियांका चोप्रानं शेअर केला व्हिडिओ : शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला निक जोनास घरातील थंड तापमानात उष्णता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मालती ही बागेत फिरत आहे. यानंतर प्रियांका मालती मेरीला फिरायला घेऊन, तिच्याबरोबर आईस्क्रीमचा आनंद घेत आहे. याशिवाय पुढं ती शूटसाठी सराव करत आहे. तसेच प्रियांकानं तिच्या कारच्या खिडकीतून सुंदर निसर्गाची झलकही दाखवली आहे. यानंतर मालती एकटीच चमच्यानं चॉकलेट डिश चाखताना दिसत आहे. तसेच मालती प्रियांकाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, 'जीवनात अलीकडे...' प्रियांकाच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.