मुंबई - Priyanka Chopra and Citadel 2 :अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. पती निक जोनासचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आता ती आपल्या कामावर परतली आहे. अमेरिकन वेब सीरीज 'सिटाडेल'चा दुसरा सीझन हा येणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. बातमी खरी असल्याचे संकेत मिळाले आहेत. या वेब सीरीजमध्ये प्रियांका चोप्रा जोनास हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेनबरोबर दिसेल. या वेब सीरीजमध्ये प्रियांका नादियाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. तिनं काही काळापूर्वी 'सिटाडेल'च्या सेटवरची एक झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे.
प्रियांका चोप्रानं शेअर केली पोस्ट : 18 सप्टेंबर रोजी प्रियांकानं इन्स्टाग्रामवर 'सिटाडेल' सीझन 2 च्या सेटवरचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'नादिया परत आली आहे. सिटाडेल सीझन 2.' या पोस्टमध्ये तिनं एक शस्त्र, लाल हार्ट आणि व्हिडिओ कॅमेरा इमोजी जोडला आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवात तिच्या क्लोज-अप शॉटमधील मिरर सेल्फीनं होते. यानंतर ती गाडीमध्ये बसून 'सिटाडेल 2' च्या सेटवर जाताना दिसते. या व्हिडिओत 'देसी गर्ल'नं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. याशिवाय तिचे अर्धे केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत. काळ्या सनग्लासेसमध्ये प्रियांकाचा लूक खूप सुंदर दिसत आहे. या क्लिपमध्ये प्रियांका म्हणते, "चल माझ्याबरोबर सेटवर." याशिवाय यानंतर ती पांढऱ्या पोशाखात कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसते.