मुंबई - पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित 'फुलवंती' हा 11 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीनं 'फुलवंती'ची मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे प्राजक्तानं या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय. 'फुलवंती' या चित्रपटाकडून प्राजक्ता माळीला खूप अपेक्षा आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झालेत. आता 'फुलवंती' चित्रपट रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात किती कमाई केली, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'फुलवंती' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन :'फुलवंती'चं बॉक्स ऑफिसवरचं तीन दिवसाचं कलेक्शन आता समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 8 लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी तब्बल 36 लाख कमाई केली. यानंतर रविवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ पाहायला मिळाली. या दिवशी 'फुलवंती'नं 75 लाखांची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1 कोटी 19 लाखचं झालं आहे. आता रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल, यावर अनेकांचं लक्ष लागलं आहे. 'फुलवंती' या चित्रपटामधील प्राजक्ताचा अभिनय अनेकांना आवडत आहेत.