मुंबई - Prabhas Raja Saab teaser release date : पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास त्याच्या अलीकडील ब्लॉकबस्टर 'कल्की 2898 एडी'च्या यशाचा आनंद घेत आहे. आता त्याचा आगामी 'राजा साब' चित्रपटही बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटामधील एक पोस्टर रिलीज झालं होतं. चाहत्यांना हे पोस्टर खूप आकर्षक वाटलं होतं. या पोस्टरमध्ये प्रभास हा लुंगी स्टाईलमध्ये दिसला होता. आता निर्मात्यांनी 'राजा साब'च्या टीझरची रिलीज तारीखसह आणखी एक पोस्टर जारी केलं आहे. निर्मात्यांनी जाहीर केले की, या चित्रपटाचं टीझर 29 जुलै रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन मारुती यांनी केलं आहे.
निर्मात्यांनी खास पद्धतीनं नवीन पोस्टर केलं शेअर :फॅन इंडिया झलक या शीर्षकासह प्रभासच्या 'राजा साब'चा टीझर चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी प्रभासला स्टायलिश लूकमध्ये दाखवले आहे. या पोस्टरचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रभास मरून जॅकेट आणि सनग्लासेस घालून फुलांनी सजवलेल्या जुन्या कारकडे झुकत आहे. पोस्टरवर लिहिलं आहे की, "राजा साब'ची पहिली झलक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5:03 वाजता प्रदर्शित होईल." चित्रपटाची निर्मिती टीजी विश्व प्रसाद यांनी केली आहे. याशिवाय 'राजा साब'ला संगीत थमन एस यांनी दिलंय.