मुंबई Poonam Pandey Death :प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. हेच नाही तर पूनम पांडे हिचे खरोखरच निधन झाले का? हा प्रश्नदेखील सातत्यानं विचारला जातोय. पूनम पांडे कोट्यवधी संपत्तीची मालकीनदेखील असून पांडे हिचं निधन झालं ही अफवा असल्याचं अनेकांना वाटतंय. त्याचं कारणही तेवढंच मोठं आहे. त्यामुळं पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल मोठा संभ्रम बघायला मिळतोय.
संभ्रमाचं कारण काय? :शुक्रवारी (2 फेब्रुवारी) पूनम पांडेची व्यवस्थापक पारुल चावला यांनी तिच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. पूनमच्या सोशल मीडिया हँडलवरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आलं की, "आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कळवताना अत्यंत दुःख वाटत आहे की, सर्व्हायकल कॅन्सरनं आमच्या पूनमला आमच्यापासून हिरावलं आहे. ती आमच्या स्मरणात राहील." मात्र, प्रसिद्ध झालेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पूनमच्या निधनाचा कोणताही तपशील, स्थान, वेळ किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची उपस्थिती याचा उल्लेख केलेला नाही. यामुळं अनेकजण या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. तर अनेकांनी ही बातमी समजताच सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
पूनमचं पार्थिव कुठे? :पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक मोठे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. एकीकडं पूनम पांडे हिचं निधन गर्भाशयातील कॅन्सरनं झाल्याचं सांगितलं जातंय. नक्की पूनम पांडे हिचं निधन कुठं झालंय? तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार? याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळं आता या प्रकरणात लवकरच मोठे खुलासे होणार असल्याची शक्यता आहे.
या कारणामुळे मृत्यूबाबत निर्माण होत आहे साशंकता
- मुंबईच्या ओशिवरा भागातील द पार्क या तिच्या हाउसिंग सोसायटीमधील शेजारच्या लोकांनी सांगितले की अभिनेत्री पुनम गेल्या दोन दिवसांपासून तिच्या घरी नाही. तिच्या घरी कोणतीही हालचाल दिसली नाही. तसंच तिच्या इमारतीच्या आत किंवा बाहेर कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
- हाऊसिंग सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने सांगितलं "अभिनेत्री पांडे दोन दिवसांपासून घरी नाही. तिचा ड्रायव्हर आज दुपारी 3:45 च्या सुमारास इमारतीबाहेर गेला होता. पुण्यातील तिच्या घराच्या आसपास कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
- अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती तिच्या नातेवाईकाकडून मिळाल्याचे निवेदन जारी केल्यानंतर पूनमच्या पीआरओकडून वृतसंस्थेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
- पांडेचे व्यवस्थापक असलेल्या निकिता शर्माचे नाव असलेल्या या ई-मेलमध्ये पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा खोटा क्रमांक दिला होता. अभिनेत्रीच्या मृत्यूची चर्चा सुरू असताना तिच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत.
हेही वाचा -
- पूनम पांडेच्या निधनावर कंगना रणौतने व्यक्त केला शोक
- पूनम पांडेला झालेला 'सर्वायकल कॅन्सर' नेमका काय असतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
- अभिनेत्री पूनम पांडे्चं कॅन्सरमुळं निधन; इन्स्टाग्राम पोस्टमुळं चाहत्यांना धक्का