मुंबई - Manu Bhaker and Sarabjot Singh:देशासाठी मंगळवार 30 जुलै हा दिवस खूप चांगला होता. भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. दोघांनी 10 मीटर एअर पिस्तूल (मिश्र दुहेरी) स्पर्धेत भाग घेतला होता. या दोघांनीही आपल्या उत्कृष्ट नेमबाजीनं पदक जिंकलं आहे. या शानदार विजयानंतर देशात आनंदाचं वातावरण आहे. आता त्यांच्या विजयाबद्दल संपूर्ण देश त्यांचं अभिनंदन करत आहे. चित्रपटसृष्टीतील स्टार्सनंदेखील दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहेत. या विजयानंतर त्याचं अनेकांनी अभिनंदन केलं आहे.
स्टार्सन केलं खेळाडूंचं अभिनंदन :बॉलिवूडमधील सुंदर जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. अजय देवगणनं सोशल मीडियावर पॅरिस ऑलिम्पिकमधील मनू आणि सरबज्योतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "बक्षीसावर नजर" या शब्दाला एका नवीन स्तर मिळत आहे. मला खूप चांगलं वाटलं. आणखी पदके आपल्याला पाहायला मिळतील, अशी आशा आहे." तसेच मीरा राजपूत कपूर, सोनाली बेंद्रे, अनिल कपूर, प्रिती झिंटा, पुलकित, सम्राट, महेश बाबू, सुनील शेट्टी, रकुल प्रीत, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक कलाकारांनी शूटर्सचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलं आहे.