मुंबई :'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी नुकतीच नवीन 'परम सुंदरी' चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर रोमान्स करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. आता सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट केरळ, दक्षिण भारतावर आधारित असेल. मॅडॉक फिल्म्स या नव्या जोडीबरोबर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे.
'परम सुंदरी' होईल या दिवशी प्रदर्शित : मोशन पोस्टर शेअर करताना, मॅडॉक फिल्म्सनं लिहिलं, 'नॉर्थचा स्वॅग, साऊथचा ग्रेस, दोन जग टक्कर घेतात आणि चमकतात. दिनेश विजन तुषार जलोटा प्रस्तुत 'परम सुंदरी', प्रेमकहाणी 25 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.' दरम्यान जान्हवी कपूरचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं, 'जान्हवी कपूरची ओळख साऊथची सुंदरी म्हणून करत आहोत, तुमचे मन वितळण्यास तयार आहे.' दुसरीकडे सिद्धार्थचे वेगळे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलं, 'सिद्धार्थ मल्होत्रा नॉर्थच्या मुंडा परमची ओळख करून देत आहोत, तो आपल्या मोहकतेनं तुमची मनं जिंकण्यासाठी तयार आहे.' मॅडॉक फिल्म्सच्या या घोषणेनं चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या पोस्टरच्या पोस्टमध्ये आता अनेक कमेंट्स करत आहेत.