मुंबई Pankaj Tripathi brother in law Died : हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेता पंकज त्रिपाठीच्या घरी एक दुःखद घटना घडली आहे. त्यांची बहीण सरिता तिवारी आणि त्यांचा मेहुणा राजेश तिवारी उर्फ मुन्ना तिवारी यांचा शनिवारी 20 एप्रिल रोजी अपघात झाला. या अपघातात राजेश तिवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सरिता तिवारी गंभीर या जखमी झाल्या आहेत. सध्या सरितावर धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनिसार, हा अपघात दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-2 वर निरसा मार्केटमध्ये संध्याकाळी 4 च्या सुमारास झाला. राजेश आणि सरिता बिहारमधील गोपालगंज येथून पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे जात असल्याचं सांगितलं जात आहे.
पंकज त्रिपाठीच्या मेहुणाचं निधन :निरसा मार्केट चौकात येण्यापूर्वी त्यांची कार डिव्हायडरला धडकली, त्यामुळे कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं राजेश आणि सरिता यांना कारमधून बाहेर काढले आणि त्यांना तात्काळ धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. इथेच राजेशला मृत घोषित केले. आता सरिताची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं आहे. सरिताच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना आपत्कालीन एचओडी डॉ. दिनेश कुमार गिंडौरिया यांनी सांगितले की, "पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे. आता सध्या त्या धोक्याबाहेर आहेत. मात्र त्यांना ठीक होण्यासाठी थोडा वेळ लागेल."