मुंबई - Cannes Film Festival 2024: कान फिल्म फेस्टिव्हल 2024 आज 14 मे पासून सुरू होत आहे. कान हे सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलं टुमदार शहर असून आता काही वेळात याठिकाणी स्टार्सचा मेळावा भरणार आहे. 77व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळतील. दरम्यान कान फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफी 'पाल्मे डी'ओर'ची एक झलक समोर आली आहे. या ट्रॉफीची झलक कानच्या अधिकृत पेजवर दाखवण्यात आली आहे. सोन्यापासून बनवलेला 'पाल्मे डी'ओर' अवार्ड सर्वोच्च पुरस्कार आहे. हे 1955 मध्ये प्रथमच सादर केला गेला होता.
'पाल्मे डी'ओर' अवार्डची झलक व्हायरल : 'पाल्मे डी'ओर' अवार्ड 18 ग्रॅम 18 कॅरेट पिवळ्या सोन्यापासून बनवलेलं आहे. पहिला 'पाल्मे डी ओर ' पुरस्कार 1955 मध्ये डेल्बर्ट मान यांना त्यांच्या 'मार्टी 'चित्रपटासाठी देण्यात आला होता. 2023 मध्ये, जस्टिन ट्रेटचा ऑस्कर विजेता चित्रपट 'एनाटॉमी ऑफ ए फाल'ला पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, हा कार्यक्रम 15 मे पासून भारतात दिसणार आहे. या सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन, अदिती राव हैदरी आणि साउथ ब्युटी शोभिता धुलिपाला या अभिनेत्री सामील होणार आहेत. दरम्यान अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव समोर आलं आहे. हा कार्यक्रम 25 मे पर्यंत म्हणजेच 12 दिवस चालेल.
पाल्मे डी'ओरच्या शर्यतीमधील नामांकन
1. द श्राउड्स ( डेविड क्रोनबर्ग)
2. द गर्ल विद द निडिल (मेगनस वोन होर्न)
3. एमिला पेरेज ( जैक्वस ऑडियार्ड)
4. मोटेल डेस्टिनो ( करीम एनोज)
5. लिमोनोवो : द बाल्ड ( किरिल्ल सेरेब्रेनीकोव)
5. पार्थेनोप ( पाओलो सोरेटिनो)
6. थ्री किलोमीटर टू द एंड ऑफ द वर्ल्ड ( इमैनुअल पर्वू)
7. द सीड ऑफ सेक्रेड फिग (मोहम्मद रुसौल्फ)