मुंबई - 'पंचायत'च्या बहुप्रतिक्षित सीझनच्या रिलीजपासून मनोरंजनाचे विविध पर्याय ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.कॉमेडी ड्रामा 'क्रू' ते सर्व्हायव्हल ड्रामा 'द गोट लाइफ'पर्यंत अनेक चित्रपट झळकणार आहेत. सस्पेन्स, विनोदी, थ्रिलर आणि इमोशनल अशा प्रकारचं हे मनोरंजन या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर उपलब्ध होणार आहे.
नेटफ्लिक्सवर क्रू (मे 24)
आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'क्रू' चित्रपटाला थिएटरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता 24 मे रोजी नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहे. तीन फ्लाइट अटेंडंटच्या कथा असलेला हा चित्रपट मनोरंजनाचा भरपूर मसाला आहे.
डिस्ने+ हॉटस्टारवर आदुजीविथम - द गोट लाइफ (मे 26)
पृथ्वीराज सुकुमारन अभिनीत 'आदुजीविथम - द गोट लाइफ' हा सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपट 26 मे रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर पदार्पण करेल. 'द गोट लाइफ' हा ब्लेसी दिग्दर्शित चित्रपट दूर देशात जाऊन अडकलेल्या व्यक्तीच्या संघर्षाची कथा आहे. बॉक्स ऑफिसवरील यशामुळे हा चित्रपट पृथ्वीराजचा आजपर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
प्राइम व्हिडिओवर पंचायत सीझन 3 (मे 28)
'पंचायत' या वेब सीरिजचा तिसरा सीझन 28 मे रोजी उपलब्ध होणार आहे. रोमँटिक आणि राजकीय घडामोडींमध्ये ग्राम सचिवाचा सहभाग हा तिसऱ्या प्रकरणाचा मुख्य विषय असेल. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, रघुबीर यादव आणि संविका यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.