महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' आठवड्यात 'हे' चित्रपट आणि वेब सीरीज होईल प्रदर्शित - OTT PLATFORM

ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज होणार आहेत. यात भारत ते साऊथ कोरियन या वेब सीरीजचा देखील समावेश आहेत.

ott platform
ओटीटी प्लॅटफॉर्म ('ऑल वी इमेजिन ऐज लाइट'-'व्हेन द स्टार्स गॉसिप' (पोस्टर))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 30, 2024, 4:15 PM IST

मुंबई : ओटीटी प्रेमींसाठी येणारे दिवस खूप मनोरंजक असणार आहेत, कारण नवीन वर्षात अनेक वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरीजमध्ये साऊथ कोरियन आणि भारतीय शोचा समावेश आहेत. या आठवड्यात 'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' हा कान विजेता चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत रिलीज होणाऱ्या ओटीटी रिलीजवर एक नजर टाकूया...

'गुनाह' सीजन 2 : डिस्ने पॉवरपॅक एंटरटेनिंग शो 'गुनाह' सीझन 2 या आठवड्यात रिलीज होणार आहे. या मनोरंजक शोमध्ये गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती आणि जैन इबाद खान महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. 'गुनाह' सीजन 2मध्ये अभिमन्यू (गश्मीर महाजनी) वर आधारित आहे, जो विश्वासघात झाल्यानंतर पुन्हा बदला घेण्यासाठी येतो. शोमध्ये हाय-स्टेक, रोमान्स ड्रामा आणि गुन्हेगारी कट यांसारखे सीन पाहायला मिळणार आहेत. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 जानेवारी रोजी प्रसारित होईल.

डोन्ट डाई: द मैन हू वॉन्ट्स टू लिव फॉरएवर : क्रिस स्मिथचा थरारक माहितीपट 'डोन्ट डाई: द मैन हू वॉन्ट्स टू लिव फॉरएवर' नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटामध्ये ब्रायन जॉन्सन यांच्या जीवनाबद्दल दाखविण्यात आलं आहे, जे त्यांच्या दैनंदिन जीवनात 50 हून अधिक औषधे, प्लाझ्मा रक्तसंक्रमण आणि इतर उपचार घेत आहेत. हे ते सर्व अमर होण्यासाठी करतात. ही वेब सीरीज नवीन वर्षाच्या निमित्तानं 1 जानेवारी 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

ऑल वी इमेजिन ऐज लाइट :कान जिंकणारा चित्रपट 'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' नवीन वर्षाच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. हा मल्याळम चित्रपट एका नर्सवर आधारित आहे, जिचे आयुष्य तिच्या एक्स पतीकडून अनपेक्षित गिफ्ट मिळाल्यानंतर बदलते. या चित्रपटात दिव्या प्रभा, हृदू हारून, कानी कुसरुती, छाया कदम आणि टिंटुमोल जोसेफ यांच्या विशेष भूमिका आहेत. 'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' ही सीरीज 3 जानेवारी 2025 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित होईल.

व्हेन द स्टार्स गॉसिप :'व्हेन द स्टार्स गॉसिप' ही साऊथ कोरियन वेब सीरीज आहे. 2025 मध्ये प्रीमियर होणाऱ्या या वेब सीरीजमध्ये, साऊथ कोरियाचे दोन सर्वात प्रतिष्ठित स्टार्स ली मिन-हो आणि काँग ह्यो-जिन प्रथमच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसतील. ली मिन हो या सीरीजमध्ये गॉन्ग र्योंगची भूमिका करत आहे, जो पर्यटक म्हणून स्पेस स्टेशनला भेट देतो. तो गुप्तपणे मोहिमेवर आहे. ही वेब सीरीज 4 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

टाइगर्स ट्रिगर (लायंसगेट प्ले) :साऊथ कोरियाचा ॲक्शन थ्रिलर 'टाइगर्स ट्रिगर' नवीन वर्षात ओटीटीवर येत आहे. वांग होबरोबर वोन जिन आणि पार्क जी-हुई या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'टायगर्स ट्रिगर' 3 जानेवारी 2025 रोजी लायन्सगेट प्ले प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details