महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ओटीटीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर झाले 'हे' चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित - वेब सीरीज

OTT Release : ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरीज या आठवड्यात प्रदर्शित झाले आहेत. तुमच्या आवडत्या कलाकारांना तुम्ही या ओटीटीवर प्लेटफॉर्मवर पाहू शकता, घ्या जाणून.

OTT Release
ओटीटी रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 1:28 PM IST

मुंबई - OTT Release : प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी, अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. आता तुम्ही या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. रणबीर स्टारर 'ॲनिमल' आणि विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर अनेकजण हे चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. याशिवाय काही वेब सीरीज देखील ओटीटी प्रदर्शित झाल्या आहेत. दरम्यान 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर'नं थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर ओटीटीवर आता धमाल करण्यासाठी सज्ज आहेत.

ओटीटी रिलीज

'ॲनिमल' :रणबीर कपूर अभिनीत 'ॲनिमल' चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल , तृप्ती डिमरी आणि इतर कलाकारांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा केलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 डिसेंबर, 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'ॲनिमल' चित्रपट हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

ओटीटी रिलीज

'सॅम बहादूर': प्रजासत्ताक दिनाच्या खास मुहूर्तावर विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' चित्रपटाचा आनंद तुम्ही झी5वर घेऊ शकता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात विक्की कौशल व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी , मोहम्मद जिशान अय्युब यांनी काम केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1 डिसेंबर, 2023 रोजी प्रदर्शित झाला.

ओटीटी रिलीज

'कर्मा कॉलिंग' : रवीना टंडनची बहुप्रतीक्षित वेब सीरीज 'कर्मा कॉलिंग' देखील डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाली आहे. 'कर्मा कॉलिंग'मध्ये रवीना टंडनशिवाय नम्रता शेठ, वरुण सूद, विराफ पटेल, रोहित रॉय, गौरव शर्मा आणि इतर कलाकार आहेत. या वेब सीरीजचं दिग्दर्शन रुची नारायण यांनी केलंय.

ओटीटी रिलीज

'नेरु' : मल्याळम चित्रपट 'नेरू' देखील 23 जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे. रुपेरी पडद्यावर 'नेरू' चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. 'नेरू'मध्ये मोहनलाल, प्रियामणी, हंसवरा राजन आणि सिद्दीकी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केलं आहे.

ओटीटी रिलीज

'ग्रिसल्डा' : क्राइम बायोपिक सीरीज 'ग्रिसल्डा' 24 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेब सीरीजमध्ये ड्रग डीलर ग्रिसेल्डा ब्लँकोची जीवनकथा दाखवली गेली आहे. या वेब सीरीजची कहाणी सत्य घटनांनी प्रेरित आहे. या वेब सीरीजमध्ये सोफिया व्हर्गारा, अल्बर्टो गुएरा, ख्रिश्चन टॅपन यांनी भूमिका केल्या आहेत.

ओटीटी रिलीज

'हस्टलर्स' :'हस्टलर्स' ही वेब सीरीज ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरीजमध्ये दिग्दर्शन हर्ष देधिया यांनी केलं आहे. 'हस्टलर्स'मध्ये विशाल वशिष्ठ, समीर कोचर, अंजली बारोट आणि अम्मन उप्पल कलाकार आहेत.

ओटीटी रिलीज

'बैडलैंड हंटर्स' : कोरियन चित्रपट 'बॅडलँड हंटर्स' देखील 26 जानेवारी रोजी ओटीटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरीजचं दिग्दर्शन हेओ म्युंग-हेंगनं केलंय. या चित्रपटात मा डोंग-सेक, ली ही-जून, ली जून-यंग आणि रोह जेओंग-युई यांनी अभिनय केला आहे. 'बॅडलँड हंटर्स' चित्रपटाचे निर्माते बियान स्युंग-मिन, स्युंग-मिन बियान हे आहेत.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
  2. मृणाल ठाकूरनं हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपट न मिळाल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त
  3. बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details