महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 5:28 PM IST

ETV Bharat / entertainment

Christopher Nolan Movies : ऑस्कर विजेते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनचे 5 धमाकेदार चित्रपट

Christopher Nolan Movies : ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांना 'ओपनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. पाहूयात क्रिस्टोफरचे असे काही चित्रपट आहेत जे खूप विशेष आहेत.

Oscar Winner Best Director Christopher Nolan Movies
ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन चित्रपट

मुंबई Christopher Nolan Movies : 'ओपनहायमर' चित्रपटानं ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटाला फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2024 मध्ये एकूण 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही जिंकलं आहे. आता या विजयाचे संपूर्ण श्रेय 'ओपनहायमर' दिग्दर्शिक क्रिस्टोफर नोलन यांना जाते. क्रिस्टोफरचे असे काही चित्रपट आहेत जे प्रत्येकानं नक्की पाहावेत.

  • 'ओपनहायमर' (2023) :'ओपनहायमर' गेल्या वर्षी (2023 मध्ये) रिलीज झाला होता. हा चित्रपट अणुबॉम्बचे जनक आणि अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट जे. ओपनहायमर यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात किलियन मर्फीनं शास्त्रज्ञ रॉबर्ट जे. ओपनहायमरची दमदार भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला पाहिजे.
  • 'द डार्क नाइट' (2008) : बॅटमॅन बिगिन्सचा दुसरा भाग 'द डार्क नाइट' आहे, ज्यामध्ये ख्रिश्चन बेले, मायकेल केन, हीथ लेजर, गॅरी ओल्डमन, आरोन एकहार्ट, मॅगी गिलेनहाल आणि मॉर्गन फ्रीमन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कहाणी बॅटमॅन आणि एका जोकरभोवती फिरणारी आहे.
  • 'इंसेप्शन' (2010) :क्रिस्टोफर नोलननं 2010 मध्ये 'इनसेप्शन' हा सायन्स फिक्शन चित्रपट बनवला होता. या चित्रपटाची कहाणी स्वतः क्रिस्टोफरनं लिहिली आहे. टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय केन वाताबेने देखील 'इनसेप्शन'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता.
  • 'द डार्क नाइट राइजेस' (2012) : बॅटमॅन फ्रेंचाइजीचा 'द डार्क नाइट राइजेस' हा शेवटचा भाग आहे. या चित्रपटात ख्रिश्चन बेले, मायकेल केन, गॅरी ओल्डमन, जोसेफ गॉर्डन, मॅरियन कोटिलार्ड, टॉप हार्डी, ॲनी हॅथवे आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या भूमिका आहेत. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट त्यावेळी खूप चर्चेत होता.
  • 'इंटेस्टेलर' (2014) :क्रिस्टोफर नोलननं 2014 मध्ये आणखी एक चित्रपट 'इंटेस्टेलर' बनवला. या चित्रपटाला समजून घेणं खूप कठीण आहे. हा चित्रपट आजच्या काळापेक्षा खूप पुढाचा आहे, जो 2067 चे जग दाखवतो. 'इंटेस्टेलर' चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही आजचे जग विसराल अशी या चित्रपटाची कहाणी आहे.
  • 'डंकर्क' (2017) : इंस्टॉलरनंतर तीन वर्षांनी क्रिस्टोफर नोलन 'डंकर्क' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात परतला. हा एक थ्रिलर चित्रपट आहे, जो 1940 च्या फ्रेंच युद्धावर आधारित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details