मुंबई Yash Outfits For Ravan Made With Gold : दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रणबीर कपूर यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'रामायण' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. दरम्यान, 'रामायण'बाबत एक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, साऊथचा सुपरस्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील लंकापती रावणाचा पोशाख खऱ्या सोन्यापासून बनवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात यश सोन्याचे कपडे परिधान करताना दिसणार आहे. रावणाची लंका सोन्याची होती, हे सर्वांनाच माहीत आहे. रावण हा लंकेचा राजा असल्यामुळे खऱ्या सोन्याचा वापर केला जात आहे.
'रामायण' चित्रपटाचं बजेट :रिपोर्टनुसार 'पद्मावत', 'हाऊसफुल 4' आणि 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजसाठी आउटफिट तयार करणारे डिझायनर जोडी रिंपल आणि हरप्रीत आता 'रामायण' चित्रपटासाठी कपडे डिझाइन करत आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर हा रामाची भूमिका साकारेल आणि साई ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' 3 भागात बनवल्या जाणार आहे. पहिल्या भागाचं बजेट 835 कोटी रुपये आहे. यश यानं चित्रपटात फक्त रावणाची भूमिका साकारली नाही, तर तो निर्माताही आहे.