मुंबई - Nick Jonas and priyanka chopra : निक जोनास पॉप बॉय बॅन्ड जोनास ब्रदर्सचा एक भाग आहे. गायक निक हा पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीबरोबर अनेकदा आपले फोटो शेअर करत असतो. दरम्यान, आता प्रियांका चोप्राच्या पतीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. तसेच जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट टूर पुढे ढकलण्याचे कारण देखील त्यानं व्हिडिओत सांगितलं आहे. आता निकनं शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्यानं व्हिडिओद्वारे सांगितलं की, "मी निक आहे. माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक बातम्या आहे, जी कदाचित मजेदार नसेल, परंतु सांगणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मला काहीतरी विचित्र वाटू लागलं होतं. जेव्हा मला जाग आला तेव्हा मला बोलता येत नव्हते आणि त्या रात्री मी कॉन्सर्टसाठी सराव करत होतो. गेल्या दोन दिवसांपासून माझी प्रकृती हळूहळू खराब होत आहे. मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप वाईट खोकला मला आहे."
निक जोनासनं शेअर केला व्हिडिओ :यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "डॉक्टरांना दाखवूनही माझी तब्येत बरी झाली नाही. याशिवाय त्यानं या पोस्टवर लिहिलं होत की, "हाय मित्रांनो. मी आजूबाजूला पसरत असलेल्या इन्फ्लूएंझा-एच्या धोकादायक ताणानं त्रस्त आहे आणि याक्षणी मी कोणत्याही कॉन्सर्टमध्ये गाऊ शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. हे शो आता ऑगस्टमध्ये होतील. याशिवाय त्यांन कॉन्सर्टच्या डेट देखील आपल्या पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत. निक 'इन्फ्लूएंझा ए' आहे. आता निकची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहे. आता अनेकजण निक जोनासला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.