ETV Bharat / entertainment

रामोजी फिल्म सिटीत होणार एड शीरनचा कॉन्सर्ट, भारतात या शहरात होणार कार्यक्रम

ब्रिटीश पॉप स्टार एड शीरननं त्याच्या 2025 मधील भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. याची तिकीट कधी आणि कुठे उपलब्ध असतील हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Ed Sheeran's concert
एड शीरचा कॉन्सर्ट ((Tour Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 29, 2024, 5:23 PM IST

Updated : Nov 29, 2024, 5:33 PM IST

मुंबई - शेप ऑफ यू, परफेक्ट सारख्या गाण्यांसाठी लोकप्रिय असलेला ब्रिटीश पॉप स्टार एड शीरन याच्या 2025 मधील भारताच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे. त्याचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा भारत दौरा असणार आहे. मार्च 2024 मध्ये मुंबई झालेल्या भव्य कॉन्सर्टनंतर शीरन दिल्लीसह भारतातल्या 6 शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे. त्यानं नुकताच त्याचा दौरा जाहीर केला आहे.

एड शीरन या शहरांमध्ये करणार परफॉर्म

एड शीरन भारतातील 6 शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे, यामध्ये पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, शिलाँग आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. काही निवडक कार्डधारकांसाठी 9 डिसेंबरला मनोरंजन प्लॅटफॉर्म बुक माय शोवर प्री-सेल तिकिटे लाइव्ह होतील, तर सर्वसाधारण तिकीट विक्री 11 डिसेंबरपासून सुरू होईल. इंस्टाग्रामवर टूरची घोषणा करताना शीरनने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या सुंदर देशाच्या माझ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टूरसाठी भारतात परत येत आहे. तसेच पहिल्यांदाच भूतानला येत आहे. दशकभरात प्रथमच कतारला परत येत आहे आणि बहरीनमध्ये पुन्हा त्या सुंदर अ‍ॅम्फीथिएटरमध्ये शो करणार आहे. मी तुम्हा सर्वांना तिथे भेटण्यासाठी खूप आतुर झालो आहे. भारतात 11 डिसेंबरला, भूतानमध्ये 30 नोव्हेंबरला आणि कतार आणि बहारीनमध्ये 6 डिसेंबरला तिकीट उपलब्ध होतील.

एड शीरनचा भारत दौरा असा असेल

  • पुणे : यश लॉन्स येथे ३० जानेवारी
  • हैदराबाद: रामोजी फिल्म सिटी येथे २ फेब्रुवारी
  • चेन्नई : वायएमसीए मैदानावर ५ फेब्रुवारी
  • बंगळुरू: 8 फेब्रुवारी रोजी NICE मैदानावर
  • शिलाँग: जेएन स्टेडियमवर १२ फेब्रुवारी
  • दिल्ली एनसीआर: १५ फेब्रुवारी लेझर व्हॅली ग्राउंड

2024 च्या मुंबई कॉन्सर्टच्या प्रचंड यशानंतर, चाहते शीरनच्या 2025 च्या दौऱ्यासाठी उताविळ झाले आहेत. मुंबईच्या दौऱ्यात त्यानं अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींच्या घरी भेट देऊन मैत्रीचा हात पुढं केला होता. स्टार किड्स पासून ते त्यांच्या मित्रांचंही त्यानं भरपूर मनोरंजन केलं होतं. या दौऱ्यात तो अनेक उपक्रमातही सामील झाला होता. त्यामुळे त्याच्या आगामी दौऱ्याकडं लोक नजर ठेवून होते. भारताच्या आगामी दौऱ्यात शेप ऑफ यू, थिंकिंग आऊट लाऊड, परफेक्ट आणि शिव्हर्स यांसारखे त्याचे क्लासिक्स आणि त्याच्या नवीन अल्बममधील ट्रॅक या दौऱ्यामधील मोठं आकर्षण असेल.

Last Updated : Nov 29, 2024, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.