ETV Bharat / entertainment

सामंथा रुथ प्रभूच्या वडिलांचे निधन, अभिनेत्रीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट - SAMANTHA RUTH PRABHU FATHE

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचं निधन झालं आहे, याबद्दल नुकतेच सामंथाने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू ((Photo: IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 29, 2024, 6:59 PM IST

मुंबई - सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचं निधन झालं आहे. यानंतर सामंथानं इंस्टाग्राम स्टोरीजवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सामंथाचा जन्म चेन्नई येथे जोसेफ प्रभू आणि निनेट प्रभू यांच्या घरी झाला. तिचे वडील तेलुगू अँग्लो-इंडियन होते. तिच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी या कठीण काळात तिच्यासाठी सांत्वनपर संदेश देऊन या दुःखद प्रसंगातून सावरण्याचा सल्ला दिला आहे.

अलीकडेच सामंथाची सिटाडेल हनी बनी ही मालिका चर्चेत आहे. त्याच्या काल झालेल्या ग्रँड सक्सेस पार्टीमध्येही ती सामील झाली होती. त्यानंतर आज अचानक तिच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीनं अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Samantha Ruth Prabhu Instagram Story
सामंथा रुथ प्रभू इन्स्टग्राम स्टोरी (Samantha Ruth Prabhu Instagram Story)

अलीकडेच सामंथानं आपल्या वडिलांबरोबर असलेल्या क्लिष्ठ नात्याबद्दल सांगितलं होतं. त्यांच्याशी असलेल्या तणावाच्या नात्यामुळं तिला भावनिक आणि वयैक्तिक पातळीवर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. ती वडिलांबद्दल बोलताना एका मुलाखतीत म्हणाली होती की, "मी मोठी होत असताना मला माझ्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. माझे वडिल तसेच होते, जसे की भारतातील बहुतांशी वडिलमंडळी असतात. त्यांना वाटत असतं की ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत."

सामंथाला वाटत होतं की तिच्या वडिलांना तिच्यातली क्षमता कळालेलीच नाही. याबद्दल बोलताना ती म्हणाली होती, "ते मला म्हणाले की, 'तू इतकी हुशार नाहीस.' कोणी जर आपल्या मुलाला असं सतत म्हणत असेल तर त्यालाही वाटत राहतं की आपण हुशार किंवा स्मार्ट नाही आणि इतका चांगलाही नाही."

ऑक्टोबर 2021 मध्ये सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाच्या लग्नाच्या एक वर्षानंतर सामंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी तिच्या लग्नाचे जुने फोटो फेसबुकवर शेअर केले. त्यांनी सांगितले होतं की, या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.