हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचा थोरला मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. या जोडप्यानं हळदी विधी आणि मंगल स्नान विधी पूर्ण केले आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाआधीच्या विधींमधील खास झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज 29 नोव्हेंबरपासून या जोडप्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे लग्नाआधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नागा चैतन्यची नववधू आकर्षक पेहरावात दिसली आहे.
Wedding Vibes ♥️ #NagaChaitanya #SobhitaDhulipala pic.twitter.com/8v8nC7c9FZ
— Teju PRO (@Teju_PRO) November 29, 2024
एका फोटोत शोभिता पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तिनं ही साडी ऑफ शोल्डर ब्लाउज चुनरीसह पेअर केल्याचं दिसत आहे. तिचा हा लूक पोनियिन सेल्वनमधील तिच्या पात्रासारखा दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती दाक्षिणात्य लग्नविधीत केल्या जाणाऱ्या पारंपरिक मंगला स्ननमसाठी तयार होताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कुटुंबातील सदस्य शोभिताचं मंगला स्नान विधी पूर्ण करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये शोभिता धुलिपाला लाल रंगाच्या पेअरमध्ये दिसत आहे. तिच्या लग्नसोहळ्यासाठी ती फुल हॅन्ड ब्लाउजसह लाल रंगाच्या सुंदर साडीत दिसली होती. तिनं चंकी चोकर आणि मांग टिक्का घालून तिचा लूक पूर्ण केला.
Naga chaitanya, Shobitha's Mangalasnanam#Chayso #NagaChaithanya #shobitadhulipala @TrendsChaitu pic.twitter.com/nTYVScRPTl
— Phani Kumar (@phanikumar2809) November 29, 2024
या जोडप्याच्या लग्नाच्या काही दिवस आधी एक चर्चा सुरू झाली होती की, तिच्या लग्नाचा सोहळा नेटफ्लिक्सवर 50 कोटींच्या मोबदल्यात विकण्यात आला आहे. मात्र या बातमीचं नागा चैतन्यानं खंडन केलं होतं. असा कोणताही करार झाला नसल्याचं तो म्हणाला होता.
Sobhita Dhulipala and Naga Chaitanya’s wedding celebrations kick off in Hyderabad! The couple’s haldi ceremony and mangala snanam offer a glimpse into the joyous festivities♥️✨ pic.twitter.com/HK9ESjfkyD
— Social Ketchup Binge (@KetchupBinge) November 29, 2024
नागार्जुनचा मोठा मोठा आणि अखिलचा थोरला भाऊ नागा चैतन्य 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्याची प्रेयसी अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करणार आहे. चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाबद्दल बोलताना नागार्जुन म्हणाला, "4 डिसेंबर जवळ आला आहे. आम्ही अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्यच्या लग्नाचे आयोजन करत आहोत. हा स्टुडिओ माझ्या वडिलांनी बांधलेला कौटुंबिक स्टुडिओ आहे. हा विवाह सोहळा तेलुगू परंपरेंचं पालन करत पार पडणार आहे. शोभिताच्या कुटुंबियांचीही तशीच इच्छा होती." डेस्टीनेशन वेडिंगचं मोठी क्रेझ सिने जगतात असताना हे जोडपं मात्र पारंपरिक लग्नविधींवर विश्वास ठेवताना दिसत आहे.