मुंबई - Rakul and Jackky at Kamakhya Devi Temple: हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर जोडी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. हे जोडपे गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात गेले. कामाख्या मातेचे दर्शन घेण्यासाठी हे दाम्पत्य कुटुंबासह येथे आले आहे. आता जोडप्यानं याठिकाणावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे देसी लूकमध्ये दिसत आहे. मंदिरातील फोटोमध्ये रकुल आणि जॅकी भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत. रकुल आणि जॅकी या दोघांनीही आपापल्या इन्स्टा स्टोरीजवर हे फोटो शेअर केले आहेत.
रकुल आणि जॅकी कामाख्या मंदिरात :याशिवाय त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्याबरोबर त्याचं कुटुंब असल्याचं देखील सांगितलं आहे. जॅकी पिवळ्या कुर्ता पायजमामध्ये तर रकुल प्रीत सिंग ऑरेंज सूट सलवारमध्ये आहे. या दाम्पत्याच्या कपाळावर त्रिपुंड लावल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येत आहे. या जोडप्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्न झाल्यानंतर हे जोडपे अद्याप हनीमूनला गेलेले नाही. याशिवाय त्यांनी मुंबईत बी-टाऊन स्टार्ससाठी कोणतीही पार्टी आयोजित केलेली नाही.