हैदराबाद - यंदाचं 2024 वर्ष समाप्तीच्या दिशेनं जात असताना रामोजी फिल्म सिटी 31 डिसेंबर रोजी वर्षाची सांगता संस्मरणीय बनवण्याची तयारी करत आहे. 2025 या नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्याची संधी यानिमित्तानं उपलब्ध होणार आहे. या रंगारंग संध्याकाळचं वैशिष्ठ्य म्हणजे भारताचा येक नंबरचा डीजे चेतस याचा लाईव्ह परफॉर्मन्स सादर होणार आहे. तो त्याच्या चमकदार बीट्सवर तमाम उपस्थितांच्या गर्दीला ताल धरायला लावणार आहे.
रंगतदार मनोरंजनाचा तडका
डीजे चेतसचा हा लाईव्ह परफॉर्मन्स शो मनोरंजनानं पुरेपूर हमी देणारा आहे. यामध्ये डीजे चेतससह उपस्थित पाहुणे वेलकम डान्स, बॉलिवूड डान्स परफॉर्मन्स, फन गेम्स आणि स्टँडअप कॉमेडीचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय इंटरनॅशनल फायर परफॉर्मन्स, जंगल थीम असलेलं एक्रोबॅटिक स्टंट्स, क्लोन शो, लायन किंग परफॉर्मन्स आणि स्क्विड गेम्सचा रंगतदार मनोरंजनाचा तडका या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहे.
तुमच्या पसंतीचं पॅकेज निवडा
या उत्सवी सोहळ्याला 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता सुरूवात होईल. उपस्थित पाहुणे त्यांच्या पसंतीनुसार पॅकेजेसच्या श्रेणी निवडू शकतात. पर्यायांमध्ये प्रीमियम टेबल्स, जोडप्यांसाठी खास आसनव्यवस्था, व्हीआयपी पॅकेजेस आणि बजेट-फ्रेंडली फॅन पिट पॅकेजेसचा समावेश आहे. या पॅकेजीसच्या किंमती 2000 रुपयांपासून सुरू होतात.