मुंबई - Nawazuddin Siddiqui : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. गेल्या वर्षी एका हायव्होल्टेज ड्रामानंतर त्यानं पत्नी आलिया सिद्दीकीपासून घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर नवाजुद्दीनचा त्रास कमी झालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या मुलांचा ताबा मिळावा म्हणून त्यानं आपल्या पत्नीला अनेकदा विनंती केली होती. यानंतर आलियानं बिग बॉस या रियलिटी शोमध्ये प्रवेश करून नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दलचे अनेक खुलासे केले होते. आता जोडप्याबद्दल एक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी कोणालाही आश्चर्यचकित करू शकते.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा लग्नाचा वाढदिवस :नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे, असं सध्या दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंद्वारे असा अंदाज लावल्या जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोत नवाजुद्दीन आणि आलिया त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. आलियानं सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या मुलांबरोबर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आलियानं नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले होते. आता 25 मार्चला आलियानं तिचा फॅमिली फोटो शेअर करत नवाजुद्दीनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.