महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनन्या पांडेच्या एक्स बॉयफ्रेंडने ब्रेकअपसाठी केली होती फसवणूक - Ananya Pandey ex boyfriend - ANANYA PANDEY EX BOYFRIEND

अनन्या पांडेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या बरोबर ब्रेकअपसाठी खोटारडेपणा केल्याचा खुलासा केला आहे. तिच्या लेटेस्ट 'सीटीआरएल' चित्रपटाचे प्रमोशन करताना तिनं हा खुलासा केला.

Ananya Pandey
अनन्या पांडे (Photo: ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 8:05 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक रंजक किस्से उघड केले आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'सीटीआरएल' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना तिने हे धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये तिनं तिच्या पूर्वायुष्यातील डेटिंगच्या अनुभवांवर स्पष्टपणे चर्चा केली. तिच्या एका हायस्कूल बॉयफ्रेंडने त्यांचे नाते संपवण्यासाठीचा बहाणा म्हणून तिची फसवणूक कशी केली याचाही एक धक्कादायक खुलासा अनन्यानं केला आहे.

अनन्या पांडेनं खुलासा केला की तिच्या दुसऱ्या एका प्रियकरानं, फुटबॉल कँपच्यावेळी दुसऱ्या कोणाला तरी किस केल्याची अफवा पसरवली होती. याबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, "मी खरोखरच अस्वस्थ झाले होते आणि मग मी त्याला याचा जाब शाळेतच विचारला आणि फुल्ल तमाशा केला. मी त्याला उडवून लावलं. खरं म्हणजे खरं आश्चर्य त्या दिवशी नंतर घंडलं. नंतर बीबीएम मेसेजमधून कबूल केलं की त्यानं प्रत्याक्षात फसवणूक केली नाही पण तिच्याशी ब्रेकअप करण्यासाठी तशी स्टोरी रचली होती."

गंमत म्हणजे अनन्याने हे देखील सांगितलं की तिला तिच्या रिलेशनमध्ये अनेक वेळा फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. "मला माहित नाही की माझी इतकी फसवणूक का झाली," असं ती आपल्या डेटिंगच्या अनुभवाबद्दल म्हणाली.

अलिकडच्या वर्षांत, अनन्याचं नाव बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरशी जोडलं गेलं होतं, परंतु दोघांनीही उघडपणे याला दुजोरा दिलेला नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला दोघे वेगळे होण्यापूर्वी ते दोन वर्षे डेट करत होते. ब्रेकअपने त्यांच्या जवळच्या लोकांनाही आश्चर्यचकित केलं असलं तरी, दोघांनीही समंजसपणे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडे अनन्या पांडे माजी मॉडेल वॉकर ब्लॅन्कोला डेट करत असल्याची अफवा पसरली आहे, तरीही तिने तिच्या सध्याच्या रिलेशन स्टेटसबद्दल काहीही बोललेलं नाही.

अनन्या पांडेचा सायबर-थ्रिलर 'सीटीआरएल' हा चित्रपट आज, 4 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रदर्शित झाला. या वर्षी सप्टेंबरमध्ये 'कॉल मी बे' या ओटीटी मालिकेत पदार्पण केल्यानंतर, अनन्या आधीच या नवीन चित्रपटासह पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये आली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details