महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"नाना पाटेकर को गुस्सा क्यों आता है", अनिल कपूरच्या या प्रश्नाला नानाचं बिनधास्त उत्तर - NANA PATEKAR SPECIAL INTERVIEW

'वनवास' चित्रपटाच्या निमित्तानं अनिल कपूरनं घेतलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरनं अनेक खुलासे केले आहेत. नानाला राग का येतो? या प्रश्नावर मात्र अनिलनं नानाला घेरल्याचं दिसलं.

Nana Patekar and Anil Kapoor
नाना पाटेकर आणि अनिल कपूर (@zeestudiosofficial Instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 5:30 PM IST

मुंबई - अनिल कपूरनं घेतलेली 'नायक' चित्रपटातील अमरीश पुरीची मुलाखत जितकी गाजली होती तितकीच त्यानं घेतलेली नाना पाटेकरचीही मुलाखत चर्चेत आली आहे. 'वनवास' चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्तानं ही खास मुलाखत झी स्टुडिओमार्फत घेण्यात आली आहे. यामध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर अनेक विषायवर भाष्य करताना दिसतात. एकमेकांची थट्ट मस्करी करतानाही यात ते दिसलेत. दोघही एकमेकांना चांगले मित्र समजतात. परंतु दोघांनी 'परिंदा' चित्रपटानंतर 19 वर्षे एकत्र काम केलं नव्हतं.

'परिंदा'चा किस्सा सांगताना नाना म्हणाला, "परिंदामध्ये अनिल कपूरनं मला खूप छळलं होतं. यात अनिलचा भाऊ जॅकीची भूमिका मी करणार होतो. यासाठी आम्ही रिहर्सल वगैरे केली होती. नंतर अनिलमुळे त्यात जॅकी आला. त्यामुळं मला त्यात आण्णा करायला मिळाला याबद्दल मला अनिलचे आभार मानाचे आहेत. पण मला अनिलमुळे ती भूमिका मिळाली नव्हती हे मात्र ध्यानात राहिलं."

त्याला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला की, "मला 'हम पांच' चित्रपटाच्यावेळी कास्टिंग डिरेक्टरचा अनुभव होता. त्यामुळं मला वाटलं की परिंदातील माझ्या भावाच्या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ योग्य आहे." नाना म्हणाला की, "त्यामुळं मला अनिलचा राग आला होता. त्यानंतर अनिल कपूरबरोबर 19 वर्षे एकत्र काम केलं नव्हतं. 19 वर्षानंतर दोघांनी 'वेलकम' चित्रपटात एकत्र काम केलं."

या चर्चेत बोलताना अनिल कपूर म्हणाला की नाना पाटेकर पार्ट्या वगैरेपासून दूर राहतो. यावर नाना म्हणाला की, मला पार्ट्यात जाणं आवडत नाही. तिथं जाऊन ग्लासभर पिण्यापेक्षा निवांत आपल्या घरी बसून प्यावं. आणि कुणतीरी मला छटाक मारुन छेडायला लागतं तेव्हा मी त्याला मुस्काटीत मारल्या शिवाय गप्प बसत नाही.

''मी तुला कधी पार्टीत जाताना पाहिलेलं नाही, तू अशा गोष्टी टाळतोस, पापाराझी आणि इतर गोष्टींपासून तू दूर राहतोस. हे कसं करतोस?'' या अनिल कपूरच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना म्हणाला, "पार्टीत जात नाही म्हणजे काय तरं तिथं एक पव्वा तर मारायचा असतो, ते तर मी घरी बसून मारु शकतो ना? त्यासाठी तिथं कशाला जायाचं? आणि तिथं असे काही फालतू लोक असतात जे पिण्याच्या बहण्यानं तुमच्याजवळ येतात आणि काही तरी फालतू बोलत राहतात, मग शिवीगाळ होते, अशा वेळी माझं डोकं फिरलं की, दोन थप्पड माराव्या वाटतात."

हा रागाचा भडका कधी पासूनचा आहे, असं विचारलं असता नाना पुढं म्हणाला, "राग म्हणजे तो समोरचा जर बकवासगिरी करत असेल तर मी तर मारणारचं." "पण प्रत्येक व्यक्तीला थोडंच मारायचं असतं," असं अनिल म्हणताच, नाना म्हणाला, "प्रेमानं समजून सांगताना ते ऐकण्याच्या अवस्थेत तो असेल तर ते त्याला सांगावं ना. तो पिऊन तर्र असतो त्याला हीच भाषा समजते." "तुझ्या या रागामुळं तुझ्याबरोबर काम करायला लोक घाबरतात, अरे इमेज थोडी बदल यार"- अनिल कपूर

"अरे ही इमेज मी थोडीच बनवली आहे, मी जसा आहे तसाच आहे. माझा चेहरा दाढी करुन इतर काही करुन बदलू शकतो पण या वयात मी..पण मी तसा नाहीय. पण तिथं जर कोणी बकवास बोलत असेल तर एक थप्पड मारावी लागते, असं नाना म्हणत राहिला. अनिल कपूर मात्र त्याला रागावर नियंत्रण ठेवण्याचा, शांत राहण्याचा सल्ला देत राहिला.

ABOUT THE AUTHOR

...view details