मुंबई - Naina Song released :अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन स्टारर 'क्रू' या चित्रपटाचा पहिला ट्रॅक 'नैना' आज 5 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. एअर होस्टेसच्या जॉब प्रोफाईल आणि काम करताना येणाऱ्या अडचणींवर आधारित या चित्रपटाची चर्चा बऱ्याचं दिवसापासून होताना दिसत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहायला मिळाला, ज्यामध्ये कॉमेडी किंग कपिल शर्माची पहिली झलक पाहायला मिळाली होती. 'क्रू' चित्रपटच्या रिलीजपूर्वी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचं नाव 'नैना' आहे. 'नैना' हे गाणं लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि रॅपर बादशाह यांनी एकत्र गायलं आहे.
'क्रू'मधील 'नैना' गाणं रिलीज : या गाण्यात क्रू गर्ल्स करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन बोल्ड ग्लॅमरस अवतार दिसत आहे. 'नैना' गाण्याचा टीझर 4 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते आणि सेलिब्रिटी या गाण्याची आतुरतेनं वाट पाहत होते. करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरनं टीझरच्या पोस्टवर लिहिलं होत की, 'वेटिंग.' यानंतर अनेक चाहत्यांना या तिन्ही अभिनेत्रीला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्यांदाच या हिट गाण्यासाठी दिलजीत दोसांझ आणि रॅपर बादशाह हे एकत्र आले आहेत. 'नैना' या गाण्यात दोघांची केमिस्ट्री ही जबरदस्त असल्याची दिसत आहे.