मुंबई - Naga Chaitanya and Sobhita Dhulipala : 'मास' स्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला आहे. साऊथचा सुपरस्टार नागार्जुननं नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आणि एक्स हँडलवर फोटो शेअर केले आहेत. फोटोत नागार्जुनबरोबर चैतन्य आणि त्याची होणारी पत्नी शोभिता धुलिपाला दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नागार्जुननं लिहिलं, "आमचा मुलगा नागा चैतन्यचा, शोभिता धुलिपालाशी आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाला असून आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे. शोभिताच्या घरात प्रवेश झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. अभिनंदन, तुम्हा दोघांना दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 8.8.8 अमर्याद प्रेमाची सुरुवात."
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा साखरपुडा :या जोडप्याची एंगेजमेंट आज हैदराबादमध्ये झाली आहे. 2022 मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या नात्याबद्दल अफवा उडू लागल्या, जेव्हा लंडनच्या एका रेस्टॉरंटमधील दोन्ही स्टार्सचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर त्याच्या नात्याबद्दलची पुष्टी झाली होती. मात्र या जोडप्यानं आपल्या नात्याबद्दल काही उघडपणे सांगितलं नाही. दरम्यान साखरपुडा झाल्यानंतर चाहते या जोडप्याला आयुष्यभर आनंदी राहण्याच्या शुभेच्छा देत आहेत. 2021 मध्ये समांथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यचं हे दुसरे लग्न आहे.