महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संगीतकार प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिस बॉयनं 40 लाखची केली चोरी, मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल... - MUSIC COMPOSER PRITAM CHAKRABORTY

प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या मुंबईतील ऑफिसमधून 40 लाख रुपये चोरीला गेले आहेत. मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.

pritam chakraborty
प्रीतम चक्रवर्ती (pritam chakraborty - (ANI Photo))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 9, 2025, 12:19 PM IST

मुंबई - संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रीतमच्या ऑफिसमधून 40 लाख रुपये चोरीला गेले आहेत. याबद्दलची माहिती मिळताच संगीतकाराच्या मॅनेजरनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आता पोलील त्यांच्या विशेष पथकासह आरोपीला शोधत आहेत. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या मॅनेजरनं एका ऑफिस बॉयवर 40 लाख रुपये घेऊन पळून गेल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली.

प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमधून 40 लाखांची चोरी :मिळालेल्या माहितीनुसार, ऑफिसमधून 40 लाख रुपये गायब झाल्यानंतर, प्रीतमच्या मॅनेजरनं स्टाफ बॉयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं फोन उचलला नाही. यानंतर त्याचा मोबाईल फोन बंद लागला. तेव्हा मॅनेजरला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानं प्रीतम चक्रवर्ती यांना याबद्दल कळवलं. संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या मॅनेजरनं मुंबईतील मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आशिष स्याल नावाच्या एका स्टाफ बॉयनं ऑफिसमधून 40 लाख रुपये चोरी केल्याचं सांगितलं आहे.

पोलीस आरोपीच्या शोधात :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:00 वाजता घडली आहे. प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीनं 40 लाख रुपये घेऊन प्रीतम चक्रवर्ती यांच्या कार्यालयात पोहोचून त्यांचे मॅनेजर विनित छेडा यांना दिले होते. काही कागदपत्रांवर प्रीतमची सही घ्यायची असल्यानं मॅनेजरनं पैसे ट्रॉली बॅगमध्ये ठेवले. यानंतर ते प्रीतमच्या घरी गेले. परत आल्यानंतर ट्रॉली बॅगमध्ये पैसे नसल्याचं त्यांना दिसलं. कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांना कळलं की, आशिष सियाल प्रीतमच्या घरी जाण्याच्या बहाण्यानं पैसे घेऊन निघून गेला होता. यानंतर आशिषशी संपर्क साधण्याचा प्रयत्न गेला केला, मात्र त्यानं त्याचा फोन बंद केला होता. तसेच मॅनेजरला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. सध्या मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. सध्या याप्रकरणी प्रीतम कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details