मुंबई - Anant ambani and radhika merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच लग्न सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या लग्नात वेगवेगळ्या देशांमधून अनेक नामांकित व्यक्ती येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत अनंत आणि राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना नेण्यासाठी अंबानी कुटुंबानं तीन फाल्कन-2000 जेट भाड्यानं घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणी मैत्रिण राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. एअर चार्टर कंपनी क्लब वन एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन मेहरा यांनी सांगितलं की, "अंबानी कुटुंबानं लग्नातील पाहुण्यांना नेण्यासाठी तीन फाल्कन-2000 जेट भाड्यानं घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खाजगी विमाने वापरण्यात येतील. सर्व ठिकाणावरुण पाहुणे येत आहेत आणि प्रत्येक विमान देशभरात अनेक ट्रीप करताना दिसेल."
अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा त्रास मुंबईकरांना : हा भव्य भारतीय विवाह सोहळा मुंबईत वांद्रे कुर्ला सेंटर (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. 12-15 जुलै रोजी दुपारी 1 ते मध्यरात्री दरम्यान कार्यक्रमस्थळाजवळील रस्ते, फक्त कार्यक्रमाच्या वाहनांसाठी खुले असतील. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांसाठी रस्त्यावरील निर्बंधांबाबत तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत. तसेच आज 11 जुलै रोजी देखील मुंबईत रस्तावर नाकाबंदी केली जात आहे. मुंबईतील अंबानींच्या 27 मजली अँटिलियाला झुंबर आणि लाल फुलांनी सजवले आहे. सजवलेल्या कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात आधीच वाहतूक मंदावली आहे. या लग्नामुळे मुंबईमधील लोकांना जाण्यायेण्यासाठी त्रास होत आहे. गेले अनेक दिवसापासून या लग्नाचे कार्यक्रम सातत्यानं सुरू आहेत.