महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा अस्तित्वात येणार? संजय शिरसाट म्हणाले, "येणाऱ्या अधिवेशनात..." - SANJAY SHIRSAT ON LOVE JIHAD
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 17, 2025, 11:01 AM IST
|Updated : Feb 17, 2025, 11:58 AM IST
नांदेड : राज्यात 'लव्ह जिहाद' (Love Jihad) विरोधी कायदा अस्तित्वात यावा, यासाठी महायुती सरकार आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं शुक्रवारी (14 फेब्रुवारी) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केलीय. सरकारनं यासंबंधीचा एक शासन निर्णय काढला असून यामध्ये पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागातील सहा सदस्य असणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. महिला व बालविकास, अल्पसंख्यांक विकास, विधी व न्याय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा प्रत्येकी एक सदस्य आणि गृह विभागाचे दोन सदस्य समितीवर असणार आहेत. दरम्यान, 'लव्ह जिहाद' विरोधी कायद्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "लव्ह जिहाद प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलंय. मागील चार-पाच वर्षांमध्ये सव्वा लाख प्रकरणं महाराष्ट्रात घडली. मात्र, अशा प्रकरणातील पीडित मुलींचा तपास लागलेला नाही. त्यामुळं लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या सरकारचा मानस आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा अस्तित्वात येईल," असंही त्यांनी सांगितलं.