मुंबई - Son of Sardaar 2 New Actress : अभिनेता अजय देवगणचा 2012 मध्ये आलेला कॉमेडी ड्रामा चित्रपट 'सन ऑफ सरदार' अनेकांना आवडला होता. 'सन ऑफ सरदार' 2012 च्या हिट आणि यशस्वी चित्रपटांच्या यादीत असून आता या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सन ऑफ सरदारच्या माध्यमातून अजय देवगण पहिल्यांदा पगडी घालून कॅमेऱ्यासमोर आला होता. त्याचा हा लूक अनेकांना आवडला होता. अजयच्या कॉमिक टायमिंगनं चाहत्यांना खूप हसवलं होतं. आता 12 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'सन ऑफ सरदार 2' चं कास्टिंग सुरू :रिपोर्ट्सवर 'सन ऑफ सरदार 2'चं कास्टिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात यावेळी सोनाक्षी सिन्हाच्या जागी अभिनेत्री मृणाल ठाकूर अजय देवगणबरोबर दिसणार असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर अजय आणि मृणाल पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसतील. मृणालची चित्रपटातील एन्ट्री आणि सोनाक्षीच्या चित्रपटातून जाण्याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आगामी काळात अजय देवगण या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान 'सन ऑफ सरदार 2'मध्ये संजय दत्तची जागा सनी देओल घेऊ शकतो. या चित्रपटाची स्टार कास्ट काही दिवसात समोर येईल.