महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मिसेस माही जान्हवी कपूरनं वानखेडे स्टेडियमवर केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सला केलं चीअर्स - Mrs Mahi Janhvi Kapoor MI Vs KKR - MRS MAHI JANHVI KAPOOR MI VS KKR

Mrs Mahi Janhvi Kapoor MI Vs KKR : अभिनेत्री जान्हवी कपूरनं केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सला चीअर्स केलं. आता तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे.

Mrs Mahi Janhvi Kapoor MI Vs KKR
मिसेस माही जान्हवी कपूर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 3:43 PM IST

मुंबई - Mrs Mahi Janhvi Kapoor MI Vs KKR : आयपीएल 2024 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखची टीम कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला चीअर करण्यासाठी अनेक सिनेस्टार आले होते. यामध्ये जान्हवी कपूर, नुसरत भरुचा, नेहा धुपिया, अंगद बेदी यांच्यासह अनेक स्टार्स वानखेडे स्टेडियमवर हजर होते. हे सर्व स्टार्स मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांच्या टीमला सपोर्ट करताना दिसले. या सामन्यात केकेआर टीमनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएल 2024ची ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंग केलं आहे. जेव्हा मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव मैदानात केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करत होता, तेव्हा जान्हवी कपूरच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते.

जान्हवी कपूरनं शेअर केले फोटो :जान्हवी कपूरनं इंस्टाग्राम अकाऊंटवर वानखेडे स्टेडियममधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "माही डे आऊट, मिस्टर माही राजकुमार राव तुझी आठवण आली'. दरम्यान, जान्हवी कपूर स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली. जान्हवीनं यावेळी निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केला होता. याशिवाय टी-शर्टवर पुढच्या बाजूला माही असं लिहिलेले होतं. तसेच जान्हवीच्या टी-शर्टच्या मागे क्रिकेट इज लाइफ आणि लाइफ इज क्रिकेट असं लिहिलं आहे. जान्हवी कपूर तिच्या आगामी स्पोर्ट्स चित्रपट 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे.

मुंबई इंडियन्सनं हारला सामना : या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर राजकुमार राव दिसणार आहे. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटामध्ये तो क्रिकेटर एमएस धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सला विजय मिळून देणार असं वाटलं होत. मात्र मोठा शॉट मारण्याच्या धुंदीत तो आऊट झाला. सूर्यकुमार आऊट होताच संपूर्ण मुंबई इंडियन्स टीम हतबल झाली. त्यांनी हा सामाना 24 धावांनी हरला.

हेही वाचा :

  1. 'डॉन 3'साठी शूटिंग लोकेशनच्या शोधात लंडनमध्ये पोहोचला फरहान अख्तर - Farhan Akhtar Don 3
  2. 'दृश्यम'चा रिमेक न केल्याबद्दल कमल हासनविरोधात तक्रार दाखल! - Kamal Haasan
  3. 'गेम चेंजर' चित्रपटाचं चेन्नईतील शुटिंग संपलं, रिलीजचे काउंट डाऊन सुरू - Game Changer shooting

ABOUT THE AUTHOR

...view details