मुंबई - Deepika Padukone : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. नुकतीच तिनं तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता तिचे चाहते तिच्या पहिल्या मुलाच्या जगात येण्याची वाट पाहत आहेत. याआधी दीपिका पदुकोणचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका लेडी कॉपच्या लूकमध्ये दिसत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटाची शुटिंग खूप वेगानं सुरू आहे.
दीपिका पदुकोणचा लूक :दरम्यान दीपिका पदुकोण फोटोत खाकी गणवेशात लेडी दबंग दिसत आहे. तसेच तिनं तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. याशिवाय तिनं डोळ्यावर चष्मा लावलेला आहे. दीपिकाचा हा दमदार लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी या चित्रपटासाठी एक मेगा डान्स नंबर देखील शूट करणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत, मात्र दीपिका गरोदर असल्यानं ती हे करू शकणार नाही. या चित्रपटामध्ये दीपिका अॅक्शन करताना देखील दिसणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.