महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

फकीरांबरोबर गाणं गायल्यामुळे मिळाला ब्रेक, मोहम्मद रफी यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल जाणून घ्या रंजक गोष्टी... - MOHAMMAD RAFI

संगीतविश्वातील महान कलाकार मोहम्मद रफी यांची आज 100वी जयंती आहे. त्यांचा सांगीतिक प्रवास हा कसा होता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

mohammad rafi 100th birthday
मोहम्मद रफी यांचा 100वा वाढदिवस (मोहम्मद रफी (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 24, 2024, 4:55 PM IST

मुंबई -हिंदी म्युझिक इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर, प्रत्येकाच्या मनात पहिलं नाव मोहम्मद रफी यांच येते. आज 24 डिसेंबर रोजी मोहम्मद रफी यांची 100 वी जयंती आहे. रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य भारतात होतं. एका छोट्या गावातून आलेल्या मोहम्मद रफी साहब यांनी हिंदी इंडस्ट्रीत स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली. याशिवाय त्यांनी संगीत जगताला नवी दिशा दिली. आज त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या करिअर आणि आयुष्याशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

मोहम्मद रफी यांचा वाढदिवस : रफी यांनी आपल्या कारकीर्दमध्ये 7000 गाणी गायली आहेत. त्यांनी त्याच्या गायनानं चित्रपटसृष्टीत अमिट छाप सोडली आहे. शास्त्रीय सुरांपासून तर रोमँटिक सुरांपर्यंत, मोहम्मद रफी यांचे संगीतातील योगदान अतुलनीय आहे. मोहम्मद रफी हे संगीत जगतातील एक महान दिग्गज असून त्यांनी त्याच्या मधुर आवाजानं देव आनंद, दिलीप कुमार, शम्मी कपूर, गुरु दत्त, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्ससाठी अनेक सदाबहार हिट गाणी गायली आहेत. 1980 मध्ये वयाच्या 55व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं रफी ​​यांचं निधन झालं.

नाईच्या दुकानात काम केलं : रफी यांना सहा भाऊ होते. वयाच्या सातव्या वर्षी रफी साहब कुटुंबासह लाहोरला गेले होते. याठिकाणी त्यांचा मोठा भाऊ सलूनचं दुकान चालवत होता. रफी यांना अभ्यासात रस नसल्यानं ते भावाला दुकानात मदत करत होते. दुकानात असताना ते गाणी गुणगुणत असत. एकदा त्यांच्या भावाना त्यांचे गाणे ऐकले, यानंतर संगीताच्या दुनियेत त्याचा पाठपुरावा करण्याचे त्यांनी ठरवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रफीचे संगीतावरील प्रेम आणखी वाढले, जेव्हा ते एका सुफी फकीरला भेटले. हा फकीर त्यांच्या गावात आला आणि त्यांनी काही गाणी गायली, त्यानंतर ते खूप प्रभावित झाले. फकीरासारखे गाण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न देखील केला. ते सूफी गायकाबरोबर रस्त्यावर गाणी गात असत. यादरम्यान त्यांची भेट एका व्यक्तीशी झाली. यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. या व्यक्तीचं नाव जीवनलाल होतं. जीवनलाल यांनी रफी यांचं गाणं ऐकलं, यानंतर त्यांना ऑडिशनसाठी बोलावलं. रफी यांनी ऑडिशन पास केली, त्यानंतर जीवनलाल यांनी त्यांना संगीताचे धडे दिले.

मोहम्मद रफीची कारकीर्द :वयाच्या 13व्या वर्षी रफीनं पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. यानंतर त्यांनी कधीच आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. रफीच्या गाण्यांच्या यादीत भावनिक गाणी, देशभक्तीपर गाणी, रोमँटिक गाणी, कव्वाली, गझल आणि भजन यांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. दरम्यान 70व्या दशकात किशोर कुमार यांची कारकीर्द शिखरावर होती. बहुतेक संगीत दिग्दर्शक किशोर कुमार यांना त्यांच्या चित्रपटांची गाणी गायला लावत होते. त्यामुळे हळूहळू मोहम्मद रफी यांची कारकीर्द डगमगत होती, त्यांना काम मिळणे देखील बंद झालं होतं. या मागचे सर्वात मोठे कारण राजेश खन्ना असल्याचं देखील म्हटलं जाते. यानंतर 1973मध्ये धर्मेंद्र यांचा 'लोफर' हा चित्रपट आला, यामध्ये मोहम्मद रफीच्या आवाजात एक गाणे होते. हे गाणं खूप हिट ठरलं. धर्मेंद्र आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेल्या 'आज मौसम बडा बेमान है' हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या ओठावर आहे. या गाण्यामुळे धर्मेंद्र-मुमताजची जोडीही सुपरहिट ठरली. या गाण्यासाठी रफी यांचं खूप कौतुक झालं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details